पालिका कर्मचाऱ्यांचा संप सातव्या दिवशीही सुरु, शासनाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 22, 2014 00:18 IST2014-07-21T23:35:51+5:302014-07-22T00:18:12+5:30
धर्माबाद : विविध मागण्यांसंदर्भात नगरपालिकेतील सर्व कर्मचारी संपावर असल्याने धर्माबाद नगरपालिकेत शुकशुकाट दिसून येत असून सातव्या दिवशीही संप चालूच असल्याने कार्यालयीन कामे ठप्प पडली आहेत़

पालिका कर्मचाऱ्यांचा संप सातव्या दिवशीही सुरु, शासनाचे दुर्लक्ष
धर्माबाद : विविध मागण्यांसंदर्भात नगरपालिकेतील सर्व कर्मचारी संपावर असल्याने धर्माबाद नगरपालिकेत शुकशुकाट दिसून येत असून सातव्या दिवशीही संप चालूच असल्याने कार्यालयीन कामे ठप्प पडली आहेत़
शहरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे़ रात्रीला बहुतांश ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे बंद पडले असून विंचू किड्याची भीती निर्माण झाली आहे़ शहरातील विकासकामे, योजना रेंगाळत पडले असून याचा परिणाम जनतेवर होत आहे़ याची दखल घेण्यासाठी सातव्या दिवशी २१ जुलै रोजी आ़वसंतराव चव्हाण यांनी भेट दिली असता ऩप़ कर्मचाऱ्यांचे शाखा अध्यक्ष धर्मन्ना लखमावाड, रुक्माजी भोगावार, सूर्यकांत मोकले, सुभाष निरावार, भीमराव सूर्यवंशी, सविता जुन्नेवार, सुधाकर कांबळे, विठ्ठल पारेवार, शंकरराव डोप्पलवार, मारोती उल्लेवाड, गुलाम यसदानी, दत्तू गुर्जलवाड, लक्ष्मण झुंजारे, सायन्ना पातरलू, अशोक घाटे, रमाकांत बाचे, वसंत पुतळे, मिर्झा बेग आदींनी आ़चव्हाण यांना निवेदन दिले़ (वार्ताहर)
किनवट : संपात किनवट पालिकेचे कर्मचारी सहभागी असल्याने नागरी समस्यांना शहरवासियांना सामोरे जावे लागत आहे़ प्रलंबित मागण्या बुधवारपर्यंत मान्य न झाल्यास शुक्रवारपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे यांनी किनवट येथे दिला़ नगरपालिका कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्या घेवून १५ जुलैपासून संपात सहभाग घेतला आहे़ तीन कर्मचारी वगळता सर्व ऩप़ कर्मचारी संपात सहभागी झाल्याने नागरी समस्यांचा सामना शहरातील जनतेला करावा लागत आहे़ संपादरम्यान संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे, उपाध्यक्ष बाबूराव केंद्रे, जिल्हा सरचिटणीस संजय फुले, संघटक जावेद इनामदार या पदाधिकाऱ्यांनी २१ जुलै रोजी ऩप़ कर्मचाऱ्यांच्या संपाला भेट दिली़ किनवट ऩप़ संघटनेचे रवीचंद्र सुकनीकर, शंकर सावनपेल्लीवार, भगवान भंडारे व इतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला़ यावेळी जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे यांनी बुधवारपर्यंत म्हणजे २३ जुलैपर्यंत प्रलंबित मागण्या शासनाने मान्य न केल्यास २५ जुलैपासून तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारले जाण्याचे संकेत दिले़ त्यामुळे शासनाची भूमिका काय राहणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़ (वार्ताहर)