महापालिकेची उधळपट्टी; बाजार समितीत मलमपट्टी !

By Admin | Updated: December 3, 2015 00:37 IST2015-12-03T00:24:59+5:302015-12-03T00:37:34+5:30

लातूर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीच्या सभापतींनी चक्क बाजार समितीची गाडीच वापरायची सोडून दिली आहे.

Municipal corporation's extravagance; Dressing in the Market Committee! | महापालिकेची उधळपट्टी; बाजार समितीत मलमपट्टी !

महापालिकेची उधळपट्टी; बाजार समितीत मलमपट्टी !


लातूर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीच्या सभापतींनी चक्क बाजार समितीची गाडीच वापरायची सोडून दिली आहे. तर दुसरीकडे जनतेच्या पैशावर नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी चक्क केरळ दौऱ्यावर निघाले आहेत. बाजार समितीवर सत्ता काँग्रेसची आहे. महापालिकेवरही सत्ता काँग्रेसचीच आहे. परंतु दोन पदाधिकाऱ्यांच्या स्वभाव व कृतीतील फरक मात्र लक्षात घेण्यासारखे आहेत. एकिकडे सभापती दुष्काळावर काही का होईना मलमपट्टी करताहेत तर दुसरीकडे महापालिकेत उधळपट्टी सुरु आहे. अभ्यास दौऱ्याला विरोध असतानाही त्याची निविदा निघाली आहे.
जिल्ह्यातील दुष्काळाचा फटका बाजार समितीला बसतो आहे. याची जाणीव ठेवून गेल्या चार महिन्यांपासून बाजार समितीच्या सभापतीच्या खुर्चीत बसलेल्या सभापती ललितभाई शहा यांनी कार्यालयीन गाडीऐवजी स्वत:च्या मालकीची गाडी वापरणे सुरु केले आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन पाच महिने झाले. या पाच महिन्यात सभापती झालेल्या ललितभाई शहा यांनी बाजार समितीची चारचाकी गाडी न वापरण्याचा निर्णय घेतला. यामागचे कारण सांगताना त्यांनी दुष्काळामुळे बाजार समितीची आर्थिक स्थिती बिघडल्याचे सांगितले. चार महिन्यांपासून त्यांनी हा नियम पाळला आहे. दररोज नित्यनियमाने ते घरातली स्वत:ची गाडी घेऊन येतात.
बाजार समितीच्या सभापतींच्या गाडीच्या जागी त्यांची खासगी गाडी दररोज लागते. बाजार समितीच्या कोणत्याही कामासाठी ते खासगी वाहन घेऊनच जातात. लातुरातील सर्वच राजकीय नेत्यांपुढे त्यांनी हा आदर्श ठेवला आहे.
जिल्ह्यातील दुष्काळ आणि महापालिकेपुढे असलेला समस्यांचा डोंगर बाजूला ठेवून महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी जनतेच्या टॅक्समधून जमा झालेल्या पैशावर केरळ दौऱ्याला निघाले आहेत.
४लातूर महापालिका केरळच्या दौऱ्यावरुन पुरती ढवळून निघाली आहे. आॅनलाईनवर टेंडर निघाल्यापासून तर आता केरळ दौरा हमखास पक्का समजला जात आहे. त्यामुळे माहौल खुशीचा आहे. ‘सभागृहाचे कामकाज’ शिकायला नगरसेवक केरळला जात आहेत. कोचीला प्रशिक्षण आणि बाकीच्या सहा ठिकाणी कशाचे दौरे ? असा प्रश्न विचारला जात आहे.
४या केरळ दौऱ्याच्या फार्ससाठी जी गटनेत्याची बैठक झाल्याचा बनाव केला जात आहे. कारण राष्ट्रवादीचे गटनेते मकरंद सावे यांनी ही बैठकच झाली नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: Municipal corporation's extravagance; Dressing in the Market Committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.