महापालिका सिटी बसच्या निविदेवर होणार शिक्कामोर्तब

By Admin | Updated: April 24, 2015 00:38 IST2015-04-24T00:27:10+5:302015-04-24T00:38:17+5:30

लातूर : गेल्या वर्षभरापासून नुसतीच चर्चा असलेल्या लातूर शहर बससेवेला (सिटी बस) मूर्तरुप मिळणार असून, सिटी बस चालविण्यासाठी आलेल्या प्रस्तावावर स्थायीच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे

Municipal corporation will be on the basis of bus buses | महापालिका सिटी बसच्या निविदेवर होणार शिक्कामोर्तब

महापालिका सिटी बसच्या निविदेवर होणार शिक्कामोर्तब


लातूर : गेल्या वर्षभरापासून नुसतीच चर्चा असलेल्या लातूर शहर बससेवेला (सिटी बस) मूर्तरुप मिळणार असून, सिटी बस चालविण्यासाठी आलेल्या प्रस्तावावर स्थायीच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे. याशिवाय, हातगाडे खरेदीचा प्रस्तावही या बैठकीत मांडण्यात आला आहे. यापूर्वी मनपाकडे असलेल्या हातगाड्यांचा थांगपत्ताही नाही.
केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत लातूर शहराला गतवर्षी सिटी बसची मंजुरी मिळाली. गेल्या वर्षभरापासून लातूरकरांना सिटी बसची आस लागली आहे. खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ती यशस्वीपणे चालविण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली असून, यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सदर निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे.
शुक्रवारी सभापती पप्पू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या स्थायीच्या बैठकीत सिटी बससह अन्य विषयांनाही मंजुरी देण्यात येणार आहे. यात प्रभाग क्र. १३ मधील सुभेदार रामजी नगर येथे असलेल्या सामाजिक सभागृहाच्या दुरुस्तीसाठी ४ लाखांचा निधी खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर महापालिकेकडे कचरा उचलणे व अन्य कामांसाठी हातगाडे नसल्याने ते खरेदी करण्याचा प्रस्तावही बैठकीत घेण्यात येणार आहे. तत्कालीन नगरपालिकेने हातगाडे खरेदी केले होते. मात्र सदरील हातगाडे नेमके भंगारात आहेत की, अन्य कुठे? याचा शोध घेण्याची गरज आहे. याशिवाय, मानधनावर असलेल्या आरोग्याधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा विषयही स्थायीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.
आरोग्याधिकारी महेश पाटील यांनी आपल्याला असलेले मानधन अत्यंत तुटपुंजे असून गेल्या काही वर्षांपासून आपण काम करीत असल्याचे अर्जात म्हटले आहे. त्यामुळे किमान ४० हजार रुपये प्रतिमाह मानधन मिळावे, अशी मागणी त्यांनी केल्यामुळे हा विषय स्थायीत ठेवण्यात आला आहे.
आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचा कांगावा करणारी मनपा यावर काय निर्णय घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Municipal corporation will be on the basis of bus buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.