महापालिकेने सुरु केली जप्ती मोहीम

By Admin | Updated: August 15, 2014 00:02 IST2014-08-14T23:17:51+5:302014-08-15T00:02:07+5:30

परभणी : शहरातील करांची थकबाकी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने प्रभाग समिती अ अंतर्गत जप्ती मोहीम सुरु केली आहे.

Municipal Corporation started seizure campaign | महापालिकेने सुरु केली जप्ती मोहीम

महापालिकेने सुरु केली जप्ती मोहीम

परभणी : शहरातील करांची थकबाकी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने प्रभाग समिती अ अंतर्गत जप्ती मोहीम सुरु केली आहे.
प्रभाग समिती अ अंतर्गत घरपट्टी व नळपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करण्याच्या सूचना उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील यांनी दिल्या आहेत. या संदर्भात आयोजित बैठकीत त्यांनी वसुलीचे आदेश दिले. शहरातील थकबाकीदार नळधारकांची यादी अनेक वर्षांपासून आहे.
बिल कलेक्टर यांना घरोघरी जावून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही थकबाकीदार मालकाची गैय करु नका. तसेच दररोज वसुलीचा अहवाल देण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. त्यामुळे १२ आॅगस्टपासून प्रभाग समिती प्रमुख सय्यद इमरान यांनी नळपट्टी व घरपट्टी थकबाकीदारांची बैठक घेऊन दररोज सकाळी ८ ते १२ या वेळात वसुली व जप्ती मोहीम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal Corporation started seizure campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.