शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

ऐन उन्हाळ्यात छ. संभाजीनगर, जालनाचा पाणीपुरवठा बंद? पाणीपट्टी थकल्याने कडाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:58 IST

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने (कडा)मनपाला नोटीस बजावून पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा मंगळवारी जायकवाडी येथून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला

छत्रपती संभाजीनगर : वारंवार मागणी करूनही शहर महापालिकेने पाणीपट्टीच्या बिलाची थकबाकी असलेल्या ५३ कोटी रुपयांपैकी केवळ चार कोटी पाच लक्ष रुपयांचाच भरणा केला आहे. आता मार्च एंडच्या तोंडावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने (कडा)मनपाला नोटीस बजावून पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा मंगळवारी जायकवाडी येथून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. अशाच प्रकारे जालना महापालिका, पैठण आणि गंगापूर न.प. नाही नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

जायकवाडी प्रकल्पातून छत्रपती संभाजीनगर शहराला दरमहा ४.५० दलघमी पाणी पुरवठा करण्यात येतो. कडा कार्यालयाकडून महापालिकेला दरमहा १ कोटी २५ लाख रुपयांचे बिल देण्यात येते. महापालिकेकडून कडाला पाणीपट्टीचे बिल नियमित अदा करण्यात येत नाही. यामुळे बिलाची रक्कम वाढत असते. वेळेवर बिल न भरण्यास जलसंपदा विभागाकडून या रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते. जानेवारी २०२५ अखेर महापालिकेकडे ५३ कोटी रुपयांची पाणी बिले थकविली आहेत. शहर मनपाने कडा कार्यालयास आतापर्यंत ४ कोटी ५० लाख रुपये दिले आहेत. उर्वरित रक्कम अदा करावी, यासाठी कडा कार्यालयाचे अधिकारी वारंवार मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिल अदा करण्याची विनंती करीत असतात. आता मार्च एंडजवळ येताच कडाच्या वतीने वसुलीसाठी तगादाही वाढविला आहे. महापालिकेला नोटीस बजावून सोमवारपर्यंत बिल अदा न केल्यास मंगळवारी जायकवाडी येथून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला.

मंगळवारी पाणीपुरवठा खंडित करणारजायकवाडी प्रकल्पातून छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन मोठ्या शहरांना तसेच पैठण, गंगापूर नगर परिषदांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या स्थानिक स्वराज्य संस्थांना आमच्याकडून नियमित पाणी बिल पाठविण्यात येते. छत्रपती संभाजीनगर मनपाकडे ५३ कोटी रुपयांचे पाणी बिल जानेवारीअखेरपर्यंतचे आहे. मात्र, महापालिकेकडून वर्षभरात केवळ चार कोटी पाच लाख रुपये अदा करण्यात आले. जालना मनपा, गंगापूर आणि पैठण नगरपरिषदांनी वर्षभरात पाणी बिलापोटी एक रुपयाही अदा केला नाही. यामुळे त्यांनाही नोटीस बजावून पाणी बिल रक्कम जमा न केल्यास मंगळवारी पाणीपुरवठा खंडित करणार असल्याचे कळविले आहे.- दीपक डोंगरे, उपकार्यकारी अभियंता

जालना महानगरपालिकाएकूण थकबाकी - ९ कोटी ६८ लाखसरासरी माहे देयक रकम             - १५ लक्षसरासरी मासिक पाणीवापर - ०.८५ दलघमीआतापर्यंत भरलेली रक्कम - ००

पैठण नगर परिषदएकूण थकबाकी - ३ कोटी ३६ लाखसरासरी माहे देयक रक्कम             ४ लक्ष २५ हजारसरासरी मासिक पाणीवापर            ०.०२५ दलघमीआतापर्यंत भरलेली रक्कम -- ००

गंगापूर नगर परिषदएकूण थकबाकी -५१ लक्ष ९४ हजारमाहे देयक रकम                        -२ लक्ष ५०सरासरी मासिक पाणीवापर - ०.०८ दलघमीआतापर्यंत भरलेली रक्कम-००

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका