शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रंगमंदिराच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 18:54 IST

शहरातील कला-संस्कृतीचा खेळखंडोबा 

ठळक मुद्देपैशाअभावी कंत्राटदाराने काम केले बंदरंगमंदिराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

औरंगाबाद : संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचा घाट तर औरंगाबाद महापालिकेने मोठ्या उत्साहात घातला; पण जसजशी कामाला सुरुवात झाली, तसतसे कामाचे बजेट ‘वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे वाढत गेले. आता तर वाढलेला खर्च आणि बजेट यांचा काही ताळमेळच राहिला नसून पालिकेने चक्क पैसे नाहीत म्हणून हात वर केले असून, रंगमंदिराचे काम मागील कित्येक दिवसांपासून ठप्प आहे.

कला-संस्कृतीचा हा खेळखंडोबा नाट्यरसिकांना व्यथित करणारा असून, पैसे आले की काम करू, असे थंड धोरण महापालिकेने स्वीकारलेले आहे. काम सुरू केले तेव्हा रंगमंदिराच्या कामकाजासाठी येणारा अंदाजित खर्च ५ ते ६ कोटी असणार होता; पण आता हा खर्च ९ कोटींपेक्षाही अधिक लागणार असल्याचे सांगितले जाते. रंगमंदिराच्या या भिजत घोंगड्याविषयी ‘लोकमत’ने दि. २९ आॅक्टोबर २०१८ रोजी परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजू वैद्य यांनी जून-२०१९ ला काम पूर्ण होईल, असे सांगितले होते. मनपा अधिकाऱ्यांकडूनही याला दुजोरा देण्यात आला होता; पण प्रत्यक्षात मात्र पैशाअभावी सर्वच व्यवहार ठप्प आहेत. आता मनपाकडे पैसा येईपर्यंत वाट पाहत बसण्याची वेळ रंगकर्मी आणि सामान्य रसिकांवर आली आहे. पालिकेच्या या थंडगार धोरणाचा मोठा फटका नाट्य व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांना बसला असून, यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक कुचंबणेला तोंड द्यावे लागत आहे. 

रंगमंदिराकडे प्रशासनाचे दुर्लक्षलोकप्रतिनिधी म्हणून आम्ही रंगमंदिरासाठी केवळ अर्ज-विनंत्या करू शकतो; पण रंगमंदिरासाठी पैसा पुरविणे हे पूर्णपणे प्रशासनाचे काम आहे. सद्य:स्थिती पाहता रंगमंदिराच्या कामाला मनपा आयुक्तांचे प्रथम प्राधान्य आहे, असे दुर्दैवाने दिसत नाही. त्यांचे या कामी दुर्लक्ष होत असून त्यांनी लवकरात लवकर रंगमंदिराचे काम पूर्ण करावे, अशी त्यांना विनंती केली आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी रंगमंदिराच्या कामासाठी दोन क ोटी रुपये दिले होते; पण आता वातानुकूलित यंत्रणा बसवायचे ठरल्यामुळे बजेट वाढले. रंगमंदिराच्या कामासाठी शासनाकडून काही मदत मिळू शकेल का, यासाठी आता आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या बैठकीत आम्ही पालकमंत्र्यांपुढे पुन्हा हा प्रश्न मांडू, असे राजू वैद्य म्हणाले.

वसुली कमी आणि खर्च जास्त एसीचे आणि सिलिंगचे काम चालू होते; पण एसीच्या कामासाठी पैसे दिलेले नसल्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले आहे. एसी व सिलिंगनंतर खुर्च्या आणि स्टेज असे काम करण्यात येईल. मनपा आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती. रंगमंदिराच्या कामासाठी पैसे द्यावेत, असे त्यांनी संबंधितांना सांगितले आहे. वसुली कमी आणि खर्च जास्त यामुळे काम बंद आहे. शिवाय हे काम मनपा फंडातून करायचे आहे, त्यामुळे ते सर्वस्वी वसुलीवरच अवलंबून आहे. पैसे आले की, ३ महिन्यांत काम पूर्ण होईल.- बी. के. परदेशी, उपअभियंता, महापालिका

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीcultureसांस्कृतिकAurangabadऔरंगाबाद