महापालिकेतील उपायुक्त शिवाजी गवळी यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:04 IST2021-06-20T04:04:56+5:302021-06-20T04:04:56+5:30

राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत उपायुक्त म्हणून शिवाजी गवळी हे जानेवारी-२१ मध्ये रुजू झाले होते. सुरुवातीला त्यांच्याकडे निवडणूक विभागासह इतर ...

Municipal Corporation Deputy Commissioner Shivaji Gawli transferred | महापालिकेतील उपायुक्त शिवाजी गवळी यांची बदली

महापालिकेतील उपायुक्त शिवाजी गवळी यांची बदली

राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत उपायुक्त म्हणून शिवाजी गवळी हे जानेवारी-२१ मध्ये रुजू झाले होते. सुरुवातीला त्यांच्याकडे निवडणूक विभागासह इतर विभागाचा पदभार देण्यात आला होता. त्यानंतर उपायुक्त सुमंत मोरे यांची पदोन्नतीवर अतिरिक्त आयुक्त म्हणून अमरावती महापालिकेत बदली झाली. त्यामुळे त्यांच्याकडील आस्थापनासह इतर विभागाचा पदभार देण्यात आला. उपायुक्त पदावर असताना शिवाजी गवळी यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात येऊन त्यांची बदली लातूर महापालिकेत करण्यात आली.

तसेच सहायक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी संतोष टेंगळे हे प्रतिनियुक्तीवर वर्षभरापूर्वीच महापालिकेत रुजू झाले. सुरुवातीपासून त्यांच्याकडे वॉर्ड क्रमांक ८ कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे. आता पदोन्नतीने उपायुक्त पदावर त्यांची नियुक्ती महापालिकेतच करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने पदोन्नतीचे आदेश काढले आहेत.

Web Title: Municipal Corporation Deputy Commissioner Shivaji Gawli transferred