साथरोगापासून बचावासाठी महापालिकेचे आवाहन
By Admin | Updated: July 10, 2014 00:43 IST2014-07-10T00:13:12+5:302014-07-10T00:43:20+5:30
परभणी : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथ रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी़ पिण्याचे पाणी उकळून घ्यावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़

साथरोगापासून बचावासाठी महापालिकेचे आवाहन
परभणी : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथ रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी़ पिण्याचे पाणी उकळून घ्यावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़
पावसाळ्यामध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, विषमज्वर यासारखे साथीचे आजार फैलावण्याची भिती असते़ साथ आजार वाढू नयेत, यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी़ जेवणापूर्वी व बाळास जेऊ घालण्यापूर्वी हात साबनाने अथवा राखेने स्वच्छ धुवावेत, जुलाब झाल्यास ओआरएस पॉकीट शासकीय अथवा निमशासकीय रुग्णालयातून मोफत घ्यावे, शिळे अन्न, कापलेली फळे, उघड्यावरील अन्न खाऊ नये, स्वच्छ व असुरक्षित पाणी पिऊ नये, गटारातून जाणारे पाईप किंवा गटार ओलांडून नळ जोडणीचा पाईप गेला असल्यास त्या गटाराच्या भागापुरता तो पाईप दुसऱ्या पाईपमधून ओवून टाकावा, साथ रोगाच्या काळात औषधांबरोबरच पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन गोळ्या व तत्सम औषधी द्रव्यांचा वापर करावा, विहीर, विंधन विहीर, स्टँड पोस्ट आदी सभोवतालचा परिसर प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून चिकन गुनिया व डेंगी तापापासून संरक्षण करावे, घराच्या छतावर निरुपयोगी वस्तू ठेऊ नयेत़, घराभोवती पाणी साचू देऊ नये, जेणे करून डासांची उत्पत्ती होणार नाही, असे आवाहन महापौर प्रताप देशमुख, आयुक्त अभय महाजन, उपमहापौर सज्जू लाला, सभापती विजय जामकर, उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील, विरोधीपक्षनेते भगवान वाघमारे, गटनेते अतुल सरोदे, दिलीप ठाकूर, आरोग्य सभापती गुलमीर खान, महिला बालकल्याण सभापती तिरुमला खिल्लारे, आरोग्य अधिकारी डॉ़ कल्पना सावंत यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)
तर संपर्क साधा
नागरिकांनी नळाचे खड्डे असल्यास ते बंद करून घ्यावेत किंवा नळांना तोटी टाकावी, जलवाहिनीला गळती निदर्शनास आल्यास पाण्याच्या टाकीवरील मो़ नं़ ७७६७९७२७८७ या क्रमांकावर कळवावे किंवा प्रभाग समिती अ, ब, क कार्यालयात कळवावे, असे आवाहन मनपाने केले आहे़