शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा बिल कलेक्टरचे आंदोलन अधांतरी

By admin | Updated: March 18, 2016 00:17 IST

नांदेड : थकीत वेतन देण्याची मागणी आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी महापालिकेया बिल कलेक्टरनी १७ मार्च पासून सुरू केलेले आंदोलन अधांतरीच लटकले आहे.

नांदेड : थकीत वेतन देण्याची मागणी आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी महापालिकेया बिल कलेक्टरनी १७ मार्च पासून सुरू केलेले आंदोलन अधांतरीच लटकले आहे. महापालिकेसमोर निदर्शने करणाऱ्या बिल कलेक्टरांना उपायुक्तांनी चर्चेसाठी पाचारण केले मात्र चर्चेविनाच हे आंदोलन संपुष्टात आले.कमी कर वसुली झाल्याचा ठपका ठेवत बिल कलेक्टरचे वेतन रोखण्याचे आणि त्यानंतर आता १४ मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर वार्षिक वेतनवाढ रद्द का करु नये अशी नोटीस मिळाल्यानंतर बिल कलेक्टरनी एकत्र येत प्रशासनाविरोधात बंडांचा झेंडा फडकवला. बिल कलेक्टर गुरुवारी सकाळपासून मैदानातही उतरले होते. मात्र या आंदोलनाला नेतृत्व कुणाचे या संभ्रमात असलेल्या बील कलेक्टरनी दुपारनंतर अचानक माघार घेतली. प्रारंभी उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी बिल कलेक्टरांना चर्चेसाठी पाचारण केले. त्यावेळी मनपा कर्मचारी युनियनचे नेते गणेश शिंगे हेही त्यांच्या समवेत उपायुक्तांच्या कक्षात गेले. त्यावेळी मुंडे यांनी आपण फक्त बिल कलेक्टरशी चर्चा करणार असल्याने इतरांनी कक्षाबाहेर जावे, असे फर्मान सोडले. त्यावेळी शिंगे यांच्यासह बिल कलेक्टरही चर्चेशिवाय कक्षाबाहेर आले. त्यानंतर बिल कलेक्टरनेही निदर्शने समाप्त केली.