शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाला बायपासवर पांढरे पट्टे मारण्याचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 18:00 IST

मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व्हिस रोडचा चक्क विसर पडला आहे. 

ठळक मुद्दे वाहतूक पोलीस वगळता, सर्व्हिस रोडला अन्य यंत्रणांची बगलनागरिकांची नाराजी

औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी सर्व्हिस रोडच्या प्रश्नावर नागरिकांनी जोरदार आवाज उठविल्याने सार्वजनिक बांधकाम, मनपा तसेच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती; परंतु अपघात रोखण्यासाठी पोलीस तेवढे वाहने थोपवून धरत आहेत. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व्हिस रोडचा चक्क विसर पडला आहे. 

बायपास रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रस्ता तयार करणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर आपली जबाबदारी ढकलून देत आहे. त्यात नागरिकांना मात्र सतत गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावर फलक लावून दिशादर्शक, पांढरे पट्टे आदी कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार होते; परंतु अद्याप रस्त्याचे साईड पंखे भरण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी थातुरमातुर मुरूम तेवढा टाकला आहे. खड्डे बुजविले असले तरी महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौकापर्यंत कुठेही पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाही. 

वाहतूक कोंडी कायमथोपविलेल्या जड वाहनांचा लोंढा एकदाच सुटल्याने दुचाकीस्वार व स्कूल व्हॅनचालकांना रस्ता ओलांडणे म्हणजे अपघातास निमंत्रणच ठरते आहे. पोलीस यंत्रणेने लोखंडी बॅरिकेट लावून वाहनांना थोडीफार शिस्त लावण्याचा प्रयत्न केला; परंतु वाहतुकीला सवय लागेपर्यंत पोलिसांचा प्रयत्न असाच सुरू ठेवावा म्हणून सातारा-देवळाई संघर्ष समितीचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर लागणारी आवश्यक साधणे उपलब्ध करून दिली नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

अतिक्रमणाला विराम किती दिवसच्बायपासवरील अपघात टळले असे म्हणता येत नाही. नुकताच एका  दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. पादचाऱ्याला दत्तमंदिराजवळ दुचाकीस्वाराने धडक देऊन तो स्वत:ही जखमी झाल्याचा प्रकार घडलेला आहे. च्जड वाहने सिंगल लाईनमधून चालत नाही. तीन लेनचा अख्खा रस्ता ते व्यापतात. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचारींना डांबरी रस्त्यावरून खाली उतरावे लागते. त्यामुळे घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी सर्व्हिस रोड बनवावा, अशी मागणी राजू राठोड, पद्मसिंग राजपूत, माजी ग्रा.पं. सदस्य विठ्ठल काळे, राजू नरवडे आदींनी केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग