मुंडे यांच्या अस्थींचे विसर्जन
By Admin | Updated: June 24, 2014 00:07 IST2014-06-23T23:57:24+5:302014-06-24T00:07:27+5:30
नर्सी नामदेव : भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा अपघाती निधनानंतर सर्वत्र त्यांच्या अस्थींचे विसर्जन होत आहे.
मुंडे यांच्या अस्थींचे विसर्जन
नर्सी नामदेव : भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा अपघाती निधनानंतर सर्वत्र त्यांच्या अस्थींचे विसर्जन होत आहे. नर्सी येथील नामदेव मंदिराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीत २३ जून रोजी दुपारी १२.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ‘अमर रहे’च्या घोषणांसह मंत्रोच्च्यारामध्ये अस्थी विसर्जन करण्यात आले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अस्थीकलश सोमवारी सकाळी १० वाजता नर्सी नामदेव पाटीवर वाहनातून आणण्यात आला. यावेळी अस्थीकलशावर उपस्थितांनी पुष्पहार, फुले वाहून श्रद्धांजली दिली. गावातील पाटी ते नामदेव मंदिरापर्यंत टाळ, मृदंग, अभंगाने मिरवणुकीद्वारे अस्थीकलश कयाधू नदीपर्यंत नेण्यात आला.
‘मुंडे साहेब अमर रहे’ च्या घोषणा देत कार्यकर्ते पुढे चालत होते. अनेक कार्यकर्त्यांनी यानिमित्त मुंडन केले होते. बाबाराव बांगर यांनी धार्मिक विधी करून कयाधू पात्रात मुंडे यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, सखाराम मुटकुळे, तानाजी मुटकुळे, माणिक लोंढे, आनंदा गुहाडे, संतोष टेकाळे, डॉ. राजेश भोसले, मनोज शर्मा, रामेश्वर शिंदे, फुलाजी शिंदे, गणेश बांगर, उमेश नागरे, गोविंदराव भवर, सुधाकर पाटील, सरचिटणीस बी.डी. बांगर, शाहूराव देशमुख, निवृत्ती नागरे, पिंटू अग्रवाल, अॅड. प्रभाकर भाकरे, डॉ. गाडे, पप्पू उफाड, श्रीराम मुटकुळे, पंढरीनाथ ढाले, शाहुराव देशमुख, जगन करंडे, शिवाजी थोरात, डॉ.राजेश भोसले, रामेश्वर श्ािंदे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)