मुंडे पिता-पुत्राच्या अपिलावर सुनावणी

By Admin | Updated: April 10, 2015 00:37 IST2015-04-10T00:04:52+5:302015-04-10T00:37:07+5:30

परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालकपदासाठीच्या निवडणुकीत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व त्यांचे वडील पंडितराव मुंडे यांचे अर्ज बाद ठरविले होते

Munde's father-son hearing on appeal | मुंडे पिता-पुत्राच्या अपिलावर सुनावणी

मुंडे पिता-पुत्राच्या अपिलावर सुनावणी


परळी : येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालकपदासाठीच्या निवडणुकीत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व त्यांचे वडील पंडितराव मुंडे यांचे अर्ज बाद ठरविले होते. त्यांच्या अपिलावर बुधवारी औरंगाबाद येथील साखर सहसंचालकांकडे सुनावणी झाली.
२१ जागांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. मुंडे पिता-पुत्रांच्या नामनिर्देशनपत्रांवर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप होते. साखर सहसंचालक आर. पी. सुरवसे यांच्याकडे गुरूवारी सायंकाळी सुनावणी झाली. रात्री ११ पर्यंत सुनावणी चालली. अपिल केलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधीसह आक्षेप घेतलेल्यांचे म्हणणे सुरवसे यांनी नोंदविले. गुरूवारी उशिरापर्यंत निर्णय जाहीर झाला नव्हता. शुक्रवारी सुनावणीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयावरच मुंडे पिता-पुत्रांचे भवितव्य अवलंबून आहे. (वार्ताहर)

Web Title: Munde's father-son hearing on appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.