परळीत मुंडे बहीण-भावाचे रणशिंग
By Admin | Updated: November 8, 2016 00:20 IST2016-11-08T00:20:29+5:302016-11-08T00:20:39+5:30
परळी : येथील पालिका निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

परळीत मुंडे बहीण-भावाचे रणशिंग
परळी : येथील पालिका निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोमवारी धनंजय मुंडे यांनी राकाँ उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. दुसरीकडे भाजप-सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत फुटला.
कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सरोजनी सोमनाथअप्पा हालगे, बन्सीधर सिरसट, अजय मुंडे, भास्कर चाटे, बाजीराव धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, एस. ए. समद, नीळकंठ चाटे आदी उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, विरोधकांजवळ बोलण्यासाठी कोणतेही मुद्दे शिल्लक नाहीत. आपल्याकडे विकास कामांची शिदोरी आहे. राष्ट्रवादी विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरे जात असून, सर्व विरोधक एकवटले असले तरी जनता विकासालाच प्राधान्य देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झाली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)