मुंडे पिता-पुत्र सहसंचालकांकडे
By Admin | Updated: April 3, 2015 00:44 IST2015-04-03T00:20:30+5:302015-04-03T00:44:26+5:30
परळी : वैद्यनाथ साखर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी पंडितराव मुंडे व धनंजय मुंडे यांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्र

मुंडे पिता-पुत्र सहसंचालकांकडे
परळी : वैद्यनाथ साखर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी पंडितराव मुंडे व धनंजय मुंडे यांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्र छानणीच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले होते. या निर्णयाच्या विरुद्ध राकाँचे ज्येष्ठ नेते पंडितराव मुंडे व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी औरंगाबादच्या साखर सहसंचालकांकडे धाव घेत अपील दाखल केले आहे.
वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या २१ जागेसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. २१ जागेसाठी १२१ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. छानणीत पंडितराव मुंडे व धनंजय मुंडे यांच्यासह २१ जणांचे अर्ज अवैध ठरले. मुंडे पिता-पुत्रानी साखर सहसंचालक यांच्याकडे अपील केले आहे. या अर्जावर ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे. (वार्ताहर)