शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचा निर्णय मुंडेंकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:39 IST

नांदेड: आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्यावर सोपवला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्यावर सोपवला़ रविवारी झालेल्या बैठकीत पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांनी सन्मानजनक आघाडी होत असेल तरच आघाडी करावी अन्यथा स्वबळावर लढावे अशी मते मांडली़राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाने आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच तिकिटे द्यावेत, तिकीट वाटपात अन्याय होऊ नये याची खबरदारी घेताना काँग्रेससोबत आघाडीचा निर्णय झाल्यास ती सन्मानजनक पद्धतीने व्हावी असेही सांगितले़ कार्यकर्त्यांची मते ऐकल्यानंतर डॉ़ कदम यांनी आघाडीचा निर्णय हे जिल्हा प्रभारी धनंजय मुंडे व माजी मंत्री कदम हे घेतील असे स्पष्ट केले़ वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याचीही पक्षाची तयारी असल्याचे ते म्हणाले़ महापालिका निवडणूक राष्ट्रवादी संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे़ कार्यकर्त्यांनीही तितक्याच जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले़ बैठकीस शहर जिल्हा कार्याध्यक्ष जीवन पाटील घोगरे, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड़ महंमदखान पठाण, मनपा गटनेत्या डॉ़ शीलाताई कदम, शहराध्यक्ष फेरोज लाला, शहराध्यक्षा कृष्णा मंगनाळे, श्रद्धा चव्हाण, मुजाहीद खान, रामनारायण बंग, भरत काकडे, प्रकाश कामळजकर, जयश्री जिंदम, विलास गजभारे, युनूस खान, प्रकाश मुराळकर, अजीज कुरेशी, सारिका बच्चेवार, रेखा शिंदे, सरफराज अहमद आदींची उपस्थिती होती़