मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:08 IST2017-07-29T01:08:35+5:302017-07-29T01:08:35+5:30

औरंगाबाद : मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने होकार कळवला आहे.

Mumbai university's answer papers to be checked in Aurangabad | मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका औरंगाबादेत

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका औरंगाबादेत

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने होकार कळवला आहे. यानुसार मुंबई विद्यापीठ विधि अभ्यासक्रमाच्या ५ हजार उत्तरपत्रिका पाठवल्या आहेत. त्या उत्तरपत्रिका औरंगाबादेतून तात्काळ तपासून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला; मात्र या प्रयोगामुळे सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल रखडले असूून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल राज्यपालांनी घेत ३१ जुलैपर्यंत सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल लावण्याचे आदेश कुलगुरूंना दिले. यातच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉ. देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. राज्याच्या विधिमंडळातही हा प्रश्न गाजत आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैपर्यंत निकाल लावणे मुंबई विद्यापीठाला अनिवार्य बनले आहे. यामुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राज्यातील इतर विद्यापीठांकडे मदत मागितली आहे. सुरुवातीला नागपूरच्या विद्यापीठाकडे उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मुंबईच्या अधिकाºयांनी धाव घेत विधि शाखेच्या ५ हजार उत्तरपत्रिका तपासून देण्याची विनंती केली. या विनंतीनुसार विद्यापीठ प्रशासनाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विधि शाखेच्या १०० प्राध्यापकांची यादी मुंबई विद्यापीठाकडे पाठवली, तसेच उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मुख्य ग्रंथालयातील संगणक उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यास परीक्षा विभागातील अधिकाºयांनी दुजोरा दिला आहे.

Web Title: Mumbai university's answer papers to be checked in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.