मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रच पाहिजे
By Admin | Updated: May 3, 2016 01:10 IST2016-05-03T00:50:20+5:302016-05-03T01:10:23+5:30
औरंगाबाद : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रच असला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक महान व्यक्तींनी महत्त्वाचे योगदान दिल्यामुळेच

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रच पाहिजे
औरंगाबाद : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रच असला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक महान व्यक्तींनी महत्त्वाचे योगदान दिल्यामुळेच आज अखंड महाराष्ट्र आपणास पाहावयास मिळत आहे. आगामी काळातही अखंड महाराष्ट्रच राहील, असे स्पष्ट मत पालकमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, स्वातंत्र्यसैनिक, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुकुंद सुरकुटवार उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘शेतकऱ्यांना दिलासा’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. आदर्श तलाठी पुरस्कार तलाठी प्रदीप कुरूद यांना प्रदान करण्यात आला.
पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस मित्रांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेरा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पोलीस महासंचालकाचे पदक देऊन गौरव करण्यात आला.पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) वसंत परदेशी, उपायुक्त (परिमंडळ २) राहुल श्रीरामे तसेच विशेष शाखेस ‘आयएसओ’ नामांकन प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महासंचालकाचे पदक प्रदान करून गौरव करण्यात आला. डी. डी. गवारे (अतिरिक्त अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), एम. डी. गायकवाड (उपायुक्त, गुप्तवार्ता), भरत काकडे (निरीक्षक, विशेष शाखा), विल्सन मॉरिस सिरील (निरीक्षक, मुख्यालय), जी. बी. धनवई, सीताराम स्वरूपचंद (राज्य गुप्तवार्ता), शेख आरिफ शेख इस्माईल (फौजदार, गुन्हे शाखा), प्रिया थोरात (सहायक निरीक्षक, ग्रामीण), गोरखनाथ शेलार (सहायक फौजदार), तुकाराम आव्हाळे, कैलास ढाकरे (जमादार), संजय तेली, संजय जगताप (पोलीस नाईक).