शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुकुंदवाडी हत्येतील आरोपी अखेर ७ दिवसांच्या पोलिस कोठडीत; पोलिसांनी दिली १२ कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:26 IST

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने पोलिसांनी केली तयारी, तब्बल १२ मुद्यांच्या आधारे मांडली कोठडीची गरज

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ झालेल्या नितीन संकपाळ यांच्या हत्या प्रकरणात अखेर ५ आरोपींना न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. विशेष न्यायाधीश ए. आर. उबाळे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. शुक्रवारी दुपारी आरोपींना एमआयडीसी सिडको पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते.

किरकोळ कारणावरून १९ जून रोजी रात्री नितीन यांच्यासह सचिन संकपाळ आणि दत्ता जाधव यांच्यावर रात्री धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. यात नितिन जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य दोघे जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी मस्तान ऊर्फ नन्ना हुसेन कुरेशी (२९), समीर खान सरताज खान (१९), बाबर शेख अफसर शेख (३२), साजिद कुरेशी ऊर्फ सज्जू अहेमद कुरेशी (२९) आणि नासीर खान मोहम्मद मुनीर खान (२०) यांना अटक केली. मात्र, पोलिसांनी अटकेची कारणे लेखी स्वरूपात न दिल्यामुळे तसेच नातेवाईकांना अटकेबाबत अधिकृतरीत्या न कळविल्याने न्यायालयाने आरोपींना तांत्रिक कारणावरून जामिनावर मुक्त केले होते.

दुपारी ३ वाजता न्यायालात हजरगुरुवारी न्यायालयाने आरोपींचा जामीन रद्द करत पुन्हा अटकेची परवानगी दिली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी शुक्रवारी सकाळीच पाचही आरोपींना हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांसोबत सल्लामसलततांत्रिक त्रुटींमुळे आरोपींना जामीन मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्या सूचनांनुसार सहायक आयुक्त सुदर्शन पाटील, निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सलग ८ दिवस कायदेतज्ज्ञांसोबत सल्लामसलत केली. कायदेशीर त्रुटी दूर करून आरोपींच्या पुन्हा अटकेसाठी मुद्देसूद मसुदा तयार केला.

१२ मुद्द्यांवर पोलिस कोठडीशुक्रवारी जवळपास २५ मिनिटे चाललेल्या सुनावणीमध्ये पोलिसांनी आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसह अटकेसाठीचे १२ महत्त्वाचे मुद्दे सांगितले. १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या मुद्द्यांवर होणार तपासगुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करणे, हल्ल्याचा उद्देश काय होता, आरोपी एकत्र कसे आले, कोणाच्या मदतीने पसार झाले, हत्येसाठी चिथावणी कोणी दिली, सदर गुन्हा गंभीर असल्याने पुराव्यांची साखळी जोडून सबळ तांत्रिक, भौतिक पुराव्यांची श्रृंखला जुळवण्यावर पोलिसांचा भर असेल.

नितिनच्या कुटुंबिंयाना न्याय देणारपूर्वी राहिलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांसोबत सातत्याने संपर्कात होतो. त्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पुन्हा एकदा तयारी केली. आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा केले जातील. नितीन व त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी