मुखेड, नायगाव, अर्धापूर तालुक्यात संघर्ष यात्रा

By Admin | Updated: August 31, 2014 00:12 IST2014-08-30T23:49:43+5:302014-08-31T00:12:25+5:30

मुखेड/नायगाव/अर्धापूर : नायगाव, मुखेड, गडगा, अर्धापूर येथे आ. पंकजा मुंडे- पालवे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या संघर्ष यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Mukhed, Nayagaon, Ardhaipur Taluka clash tour | मुखेड, नायगाव, अर्धापूर तालुक्यात संघर्ष यात्रा

मुखेड, नायगाव, अर्धापूर तालुक्यात संघर्ष यात्रा

मुखेड/नायगाव/अर्धापूर : नायगाव, मुखेड, गडगा, अर्धापूर येथे आ. पंकजा मुंडे- पालवे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या संघर्ष यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
नायगाव बाजार : येथील अंबिका गार्डन मंगल कार्यालयात संघर्ष यात्रेनिमित्र आ. पंकजा मुंडे- पालवे यांची जाहीर सभा झाली. यावेळी भाजपाचे माजी खा. डी.बी. पाटील, सुरजितसिंघ ठाकूर, प्रवीण घुगे, विजय गव्हाणे, राम पाटील रातोळीकर, श्रावण भिलवंडे, बालाजी बच्चेवार, राजेश पवार, शंकर कल्याण, जुगलकिशेर लोहिया हे उपस्थित होते.
मुखेड : मुखेड येथे मोटारसायकल रॅलीने संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले. नंतर जाहीर सभा झाली. यावेळी संयोजक माजी आ. किशनराव राठोड, गोविंदराव राठोड, गंगाधर राठोड, डॉ. तुषार राठोड यांनी आ. मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह माजी आ. साबणे, राम पाटील, माजी आ. गोविंद केंद्रे, वसंत संबुटवाड, नगराध्यक्षा कालिंदी गेडेवाड, उपाध्यक्षा शहानहाजन बेगम, शंकर पाटील, नामदेव पाटील, डॉ. माधव उच्चेकर, टी.व्ही. सोनटक्के, व्यंकटराव पाटील चांडोळकर, माधव साठे, पं.स. सदस्य राजू घोडके उपस्थित होते. सभेला अशोक गजलवाड, हणमंत नरोटे, राजू पाटील, सुनील राठोड, देशमुख, शिवाजी राठोड, विश्र्वनाथ लोखंडे, राजू गुडमेवाड, रोडगे, घोगरे, मनोज भिसे, राम राठोड, राजेश गजलवावड यांचीही उपस्थिती होती.
अर्धापुरात स्वागत- शहरातील बसवेश्वर चौकात संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर कदम, सरचिटणीस ओमप्रकाश पत्रे, उद्योग आघाडीचे बाबूराव लंगडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे, शहराध्यक्ष अशोकराव देशमुख आदींनी आ. पंकजा मुंडे यांचे स्वागत केले.
यावेळी भोकर विधानसभा प्रमुख प्रवीण गायकवाड, मुदखेडचे हणमंत देशमुख, भोकरचे राजू करपे, माजी नगराध्यक्ष राम चौधरी, दिगांबर टिप्परसे, नागोराव पचलिंदे, बालाजी मरकुंदे, डॉ. बंडेवार, शंकर केशेवार, सेनेचे बबन बारसे, अशोक डांगे, रमेश क्षीरसागर, सलाऊद्दीन काझी, बालाजी गंदवाड, प्रमोद मुळे, भुजंगराव माटे, प्रल्हाद माटे, रामराव भालेराव, आयुष अली, राजू धात्रक, साहेबराव स्वामी, गजानन दाळपुसे, रामराव धात्रक, माधवराव बारसे, मेहरु कदम, रामजी पा. शिंदे यांचीही उपस्थिती होती.
गडगा- युवा मोर्चा आणि भाजपा शाखेचे अनावरण आ. पंकजा मुंडे यांच्या हस्ते गडगा येथे करण्यात आले. याशिवाय मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली. विशाल शिंदे, रमेश बैस कोलंबीकर यांनी रॅलीचे नेतृत्व केले. गडगा शाखा कार्यकारिणी अशी- अध्यक्ष- दत्ता सुरकुतवाड, उपाध्यक्ष- सुधाकर आमलापुरे, सचिव- गणेश बोरीवाले, सहसचिव- माधव पैनापल्ले, कोषाध्यक्ष- मलीकार्जन स्वामी आदी. यावेळी राजेश पवार, राम पाटील रातोळीकर यांचीही उपस्थिती होती.

Web Title: Mukhed, Nayagaon, Ardhaipur Taluka clash tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.