मुकादमाने केला उसतोड मजूराचा खून

By Admin | Updated: October 8, 2014 00:53 IST2014-10-08T00:20:12+5:302014-10-08T00:53:05+5:30

माजलगाव : येथील उसतोड मजूराला पैशासाठी चाकूने सपासप वार करून संपविल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता लोणाळा फाटा

Mukadamane kitod master robbery | मुकादमाने केला उसतोड मजूराचा खून

मुकादमाने केला उसतोड मजूराचा खून


माजलगाव : येथील उसतोड मजूराला पैशासाठी चाकूने सपासप वार करून संपविल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता लोणाळा फाटा येथे घडली़ घटनेने तालुका सुन्न झाला आहे़
अंकुश गणेश चव्हाण (वय २२, रा़ चाहूर तांडा) असे मयताचे नाव आहे़ मुकादम गोपाल जाधव (रा़ गायचारी तांडा) हा आरोपी आहे़
पोलिसांनी सांगितले, जाधव याच्याकडून चव्हाण यांनी गतवर्षी उचल घेतली होती़ उचलीचे काही पैसे शिल्लक होते़ या पैशासाठी जाधव याने अंकुश चव्हाण यांचे वडील गणेश चव्हाण व आई वालाबाई यांना लोणाळा फाटा येथे अडविले़ तेथे पैशासाठी धमकावले़ ही माहिती अंकुश चव्हाण यांना कळाल्यावर ते तेथे गेले़ तेव्हा त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले़ जाधव याने आपल्याकडील चाकूने अंकुशवर वार केले़ यात अंकुशचा जागीच मृत्यू झाला़ ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक ओ़ डी़ माने घटनास्थळी पोहचले आहेत़ आरोपी जाधवचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले़ (वार्ताहर)

Web Title: Mukadamane kitod master robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.