मुगूटकर,बडवणे यांची बाजी

By Admin | Updated: September 2, 2014 23:59 IST2014-09-02T23:52:30+5:302014-09-02T23:59:27+5:30

हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंचतर्फे ३१ आॅगस्ट रोजी वसमत येथील गणेशपेठ भागातील गणपती मंदिरात दुपारी अडीच वाजता पूजाथाळी सजावट आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

Mugootukar, Badwane's bet | मुगूटकर,बडवणे यांची बाजी

मुगूटकर,बडवणे यांची बाजी

हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंचतर्फे ३१ आॅगस्ट रोजी वसमत येथील गणेशपेठ भागातील गणपती मंदिरात दुपारी अडीच वाजता पूजाथाळी सजावट आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्यात थळी सजावटीत प्रांजल मनोज मुगूटकर यांनी तर रांगोळीत प्राजक्ता आनंद बडवणे यांनी बाजी मारली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ज्योतीताई दांडेगावकर, फौजदार रूपाली सावंत, मनीषा कडतन यांची उपस्थिती होती. थाळी सजावटीत सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्यास्थानी मुगूटकर तर द्वितीय नीता अनिल अग्रवाल आणि तृतीयस्थानी माधवी मुरलीधर मुरक्या यांनी बाजी मारली. दुसरीकडे रांगोळीत प्राजक्ता बडवणे यांनी पहिला क्रमांक मिळविला. पूजा कातोरे आणि जगदेवी संघर्ष बेंडके यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवले. उत्तेजनार्थ पारितोषिक स्नेहा नारायण माटे यांनी पटकावले. परीक्षक म्हणून मीनाक्षी मंगेश पवार, प्रभाकर सालमोटे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी शेखर जैस्वाल तसेच श्री गुरूबाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. गणपती पूजेने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रायोजकत्व झेंडा चौकातील श्री गुरू बालक गणेश मंडळाने स्वीकारले होते. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Mugootukar, Badwane's bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.