बाजारसावंगी परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी यंदा मूग पिकाला पसंती दिली आहे. तसेच कापूस व तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून मुगाची लागवड केलेली आहे. पावसाने महिनाभराची ओढ दिल्याचा फटका या पिकाला बसला असून झाडाला शेंगांचे प्रमाण कमी आहे. यामुळे उत्पन्नात घट होईल, असे शेतकऱ्यांचे मत बनले होते. बहुसंख्य शेतकऱ्यांनी मूग तोडणीवर आल्यामुळे तोडणीला सुरुवातही केली होती. मात्र, चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे मुगाच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटू लागले आहेत. शेतकऱ्यांनी मुगाचा पीकविमा भरलेला असून भरपाई देण्याची मागणी सरपंच अप्पाराव नलावडे यांच्यासह भीमराव नलावडे, भगवान कामठे, विकास कापसे, जानकीराम नलावडे, अशोक खंडागळे आदींनी केली आहे.
फोटो :
200821\screenshot_20210819-214432_facebook.jpg
मुगाला कोंब