शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

अवकाळीने मराठवाड्यातील ८२ हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल; ५.६१ टक्केच झाले पंचनामे

By विकास राऊत | Updated: March 21, 2023 12:43 IST

विभागातील सात जिल्ह्यांमध्ये नुकसान; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ६ ते ८ व १४ ते २० मार्च या काळात झालेल्या अवकाळी पावसाचा ८२ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. आठ जिल्ह्यांत या काळात १२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १९ मार्चपर्यंतच्या अहवालानुसार जिरायत ४९ हजार हेक्टर, बागायत २६ हजार हेक्टर, तर साडेपाच हजार हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. 

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गहू, कांदा, हरभरा, फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार हेक्टर, जालना १५ हजार हेक्टर, परभणी ३२७५ हेक्टर, हिंगोली साडेपाच हजार, नांदेड २३ हजार ८०१ हेक्टर, बीड ११ हजार, लातूर जिल्ह्यात साडेअकरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

१ लाख शेतकरी बाधित६ ते १९ मार्चपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे विभागातील १ लाख ५ हजार २४८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात अद्याप धाराशिव जिल्ह्यातील आकडे समोर आले आहेत. मराठवाड्यातील ५४ हजार १७१ कर्मचारी संपावर होते. सोमवारी सायंकाळी संप मिटला आहे. ८२ हजार पैकी ४६०५ हेक्टर म्हणजेच ५.६१ टक्के पंचनामे एकूण नुकसानीच्या तुलनेत झाले आहेत.

२२ मार्चपर्यंत पंचनामे पूर्ण करामराठवाड्यात मागील २० दिवसांत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे १ लाख ५ हजार २४८ शेतकऱ्यांचे ८२ हजार ३५.०८ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अंदाज असून येत्या २२ मार्चपर्यंत प्रत्यक्षात पंचनामे पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करा, असे निर्देश सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद