खरिपासाठी मिळाले मुबलक खत
By Admin | Updated: June 23, 2014 00:25 IST2014-06-22T23:33:42+5:302014-06-23T00:25:33+5:30
भास्कर लांडे , हिंगोली ‘खत दमदार तर पीक जोमदार’ या वाक्याप्रमाणे कृषी विभागाने मागणीनुसार खरीप हंगामातील गरज लक्षात घेवून उत्पादकांसाठी मुबलक खतसाठा उपलब्ध केला आहे.

खरिपासाठी मिळाले मुबलक खत
भास्कर लांडे , हिंगोली
‘खत दमदार तर पीक जोमदार’ या वाक्याप्रमाणे कृषी विभागाने मागणीनुसार खरीप हंगामातील गरज लक्षात घेवून उत्पादकांसाठी मुबलक खतसाठा उपलब्ध केला आहे. मागील आठवड्यापर्यंत तुटवडा असणाऱ्या युरियाचा २ हजार २०० मेट्रीक टनाचा रॅक आल्याने त्याची उणीव भरून निघाली. यंदा आवश्यक असलेल्या २५ हजार २०० पेक्षाही अधिक २ हजार मेट्रीक टन खत उत्पादकांसाठी मिळाला. आता जिल्ह्यात तुटवड्याऐवजी खतांच्या वाटपाचे आव्हान कृषी विभागासमोर आहे.
हरितक्रांतीपासून रासायनिक खतांचा वापर झपाट्याने वाढला. प्रारंभी उत्पादनात मोठी वाढ होत गेल्याने रासायनिक खतांची मागणी वाढली. हळूहळू या खतांचे दुष्परिणाम समोर येवू लागले. पहिल्यावेळेपेक्षा दुसऱ्यावेळी अधिक मात्रा टाकावी लागते, असा रायायनिक खतांचा नियमच असतो. अन्यथा या खतांचा विधायक परिणाम दिसून येत नाही; पण आजमितीला तर अन्य पर्याय उत्पादकांकडे नसल्यामुळे रासायनिक खतांची मागणी प्रतिवर्षी वाढतच गेली. हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने निश्चित केलेल्या ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी २५ हजार २०० मेट्रीक टन खतांचा पुरवठा अपेक्षित आहे. अद्याप पेरणीला सुरूवात झाली नसताना हंगामात आवश्यक असलेला खत जिल्ह्यास प्राप्त झाला. यंदा प्रामुख्याने युरिया खतांचा तुटवडा सुरूवातीला निर्माण झाला होता; परंतु शुक्रवारी आलेल्या रॅकमध्ये २ हजार २०० मेट्रीक टनाचा साठा मिळाल्याने आवश्यक ६ हजार ५०० पेक्षा ७ हजार ४१० युरिया प्राप्त झाला. त्या खालोखाल डीएपी खतांची उत्पादकांकडून मागणी आहे. डीएपीच्या २ हजार ७०० टनाच्या मागणीपेक्षा अधिक म्हणजे ६ हजार ९३५ मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला. २०:२०:००, १०:२६:२६ चा पुरवाठा मोठ्या प्रमाणात झाला.
दुसरीकडे १०:२०:००:१३ च्या २ हजार २०० मेटन खताची मागणी असताना एकही पिशवी प्राप्त झालेली नाही. १९:१९:१९ आणि १४:३५:१४ खतांची हीच गत असल्याने उत्पादक त्याच्या प्रतिक्षेत आहेत. उलट १७:१७:१७, २०:२०:०:१३, १८:१८:१०, १५:१५:१५:९, १३:१३:०:१६ आणि १६:२०:०:१६ या खतांची जिल्ह्यात एकाही पिशवीचे आवंटन नव्हते; परंतु आजघडीला जिल्ह्यात या खतांचाही पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. अपेक्षेपेक्षाही अधिक खत मिळाल्याने काळाबाजार किवा उत्पादकांना चढ्या दराने खते खरेदीची गरज राहिलेली नाही. यंदा सर्वच दुकानांवर मुबलक प्रमाणात खते मिळणार आहेत.
खत वाटपाचे आव्हान
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खत मिळाला तरी वाटपासाठी कृषी विभागाला जातीने लक्ष घालावे लागते. दुकानदारांकडून कृत्रिम टंचाई दाखवून चढ्यादराने खते विकण्याचे प्रकार घडू शकतात. म्हणून कृषी विभागाने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दुकानांच्या वारंवार तपासण्या करण्याचे आदेश दिले आहेत. खतांच्या काही तक्रारी असणाऱ्यांसाठी तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तक्रार निवारण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना दुकानांवर उपस्थित राहून खतांचे वाटप करण्याचे सांगितले आहे. त्यावरही काही तक्रारी असल्यास कृषी विभागाकडून दखल घेतली जाणार आहे.
खत(मे.टन) मंजूर प्राप्त वाटप शिल्लक
युरिया ६५०० ७४१४ ३७८५ ३६२९
डीएपी २७०० ६९३५ ६१६६ ७६९
एसएसपी ४४०० ३३५३ १६२८ १७२५
एमओपी २०० ७९९ ३८६ ४१३
१५:१५:१५ ४५०० ९०८ ६१८ २९०
२०:२०:०० १००० २४८८ १९६० ५२८
१६:२०:१३ २२०० ०० ०० ००
१०:२६:२६ २२०० ३४२१ २३९८ १०२३
१९:१९:१९ २०० ०० ०० ००
२४:२४:०० १०० १८८२ १४७८ ४०४
१२:३२:१६ ११०० ३५५ २८७ ६८
१४:३५:१४ ३०० ०००० ०० ००
१७:१७:१७ ०० ७३ ६३ १०
१८:१८:१० ०० १३०९ ७७९ ५३०
एकूण २५२०० २७६७७ २०२५० ७४२७
उत्पादकांनी एकाच कंपनीच्या खतांची मागणी केल्यामुळे युरियाची टंचाई सुरूवातीला जाणवली. आता २२०० मे.टन खत आल्याने युरियाची गरज भासली आहे. खतामधील अन्नद्रव्य, मुलद्रव्य समान असल्यामुळे सर्व कंपन्याची खते चांगला रिझल्ट देतात. उत्पादकांनी एकाच कंपनीच्या खतांचा अट्टाहास धरू नये.
- संजय नाब्दे,
कृषी विकास अधिकारी