शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेत सत्ताधारी साधणार हॅटट्रिक?

By राम शिनगारे | Published: June 23, 2023 5:13 PM

२ जुलै रोजी कार्यकारी मंडळासाठी निवडणूक; सत्ताधाऱ्यांचा 'जैसे थे' स्थिती ठेवण्यावर भर

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱ्या सर्वांत मोठ्या शैक्षणिक संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष, सरचिटणीसांसह २१ सदस्यांच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक २ जुलै रोजी देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात होणार आहे. या निवडणुकीत विद्यमान सत्ताधारीच सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्याची शक्यता असून, अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके, तर सरचिटणीसपदी आ. सतीश चव्हाण यांची तिसऱ्यांदा फेरनिवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

म.शि.प्र. मंडळावर मागील दहा वर्षांपासून मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांचे संपूर्ण वर्चस्व आहे. त्यांनी सरचिटणीस म्हणून १६ जून रोजी मंडळाची सर्वसाधारण सभा २ जुलै रोजी बोलावली आहे. या सभेत १० जुलै २०२३ ते ९ जुलै २०२८ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सरचिटणीस, दोन सहचिटणीस, कोषाध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाचे १४ सदस्य निवडले जाणार आहेत. विद्यमान अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. या निवडणुकीत दहा वर्षांपासून सत्ताधारी पदाधिकारीच पुन्हा एखादा अपवाद वगळता सत्तास्थानी येतील. काहींच्या पदांमध्ये बदल होऊ शकतो. तर, काही जण कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी नव्याने येतील, अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली. सत्ताधाऱ्यांचे सर्व काही सुरळीत सुरू असल्यामुळे 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्यावर भर असून, त्यात सरचिटणीस आ. चव्हाण यांचेच पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित होणार आहे.

संस्थेचा आठही जिल्ह्यांत विस्तारम.शि.प्र. मंडळाच्या विविध माध्यमांच्या शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचा विस्तार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आहे. त्यात प्राथमिक शाळांची संख्या १४, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या ५४, व्यावसायिकसह पारंपरीक महाविद्यालयांची संख्या २३ आणि सीबीएसई शाळांची संख्या ११ एवढी असून, सर्वांची एकूण संख्या १०२ एवढी मोठ्या प्रमाणात आहे.

खंडपीठाने याचिका फेटाळली२ जुलै रोजी म.शि.प्र. मंडळाच्या निवडणुकीसाठी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेला स्थगिती देण्यासाठी काही सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, संबंधितांच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे २ जुलै रोजी मंडळाच्या कार्यकारी समितीसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणMSP Mandalमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळAurangabadऔरंगाबादSatish Chavanसतीश चव्हाणPrakash Solankeप्रकाश सोळंके