एमएसएम, औरंगाबाद सेंट्रल संघ अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:38 IST2018-02-23T00:38:20+5:302018-02-23T00:38:50+5:30
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल कोर्टवर झालेल्या थ्री आॅन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत एमएसएम संघाने मुलींच्या १२ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले. औरंगाबाद सेंट्रल संघ मुलांच्या १९ वर्षांखालील गटात चॅम्पियन ठरला.

एमएसएम, औरंगाबाद सेंट्रल संघ अजिंक्य
औरंगाबाद : मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या बास्केटबॉल कोर्टवर झालेल्या थ्री आॅन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत एमएसएम संघाने मुलींच्या १२ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले. औरंगाबाद सेंट्रल संघ मुलांच्या १९ वर्षांखालील गटात चॅम्पियन ठरला.
या स्पर्धेतील साखळी फेरीच्या लढतीत एमएसएमने डीएफसी संघावर ७ वि. ५ बास्केटने मात केली. विजयी संघाकडून प्रशंसा बडगुजर, श्रद्धा कोतवाल, प्रतीक्षा कडपे, भूमिका पवार यांनी अफलातून कामगिरी केली. पराभूत संघाकडून ईश्वरी सपकाळ, आर्या पाटील, जान्हवी सोनवणे यांनी झुंजार खेळ केला.
मुलांच्या १९ वर्षांखालील गटात औरंगाबाद सेंट्रल संघाने एसएसएम संघाचा १५ विरुद्ध १३ बास्केटने पराभव केला. चुरशीच्या झालेल्या या लढतीत सामना संपण्यास ३0 सेकंद बाकी असताना एमएसएमच्या प्रेम मिश्राने बाहेरून बास्केट करण्याच्या नादात चेंडूंवरील नियंत्रण गमावले व त्याचा अचूक फायदा घेत औरंगाबाद सेंट्रलच्या विश्वजित बहुरेने बास्केट नोंदवत संघास निर्णायक विजय मिळवून दिला. विजयी संघाकडून विश्वजित बहुरे, आकाश सुलाने, रोहन जाधव यांनी निर्णायक कामगिरी केली. एमएसएमकडून प्रेम मिश्रा, अफ्फान सादेक, प्रियांशू मिश्रा यांनी झुंजार खेळ केला.