महावितरणची वीज महागडी

By Admin | Updated: May 12, 2016 01:01 IST2016-05-12T00:05:13+5:302016-05-12T01:01:24+5:30

औरंगाबाद : महावितरण कंपनीची वीज महागडी ठरत असल्याने खुल्या बाजारपेठेतून वीज खरेदी करण्याच्या पर्यायाची चाचपणी औरंगाबादेतील उद्योगांनी बुधवारी (दि.११) येथे झालेल्या कार्यशाळेतून केली.

MSEDCL's electricity costlier | महावितरणची वीज महागडी

महावितरणची वीज महागडी

औरंगाबाद : महावितरण कंपनीची वीज महागडी ठरत असल्याने खुल्या बाजारपेठेतून वीज खरेदी करण्याच्या पर्यायाची चाचपणी औरंगाबादेतील उद्योगांनी बुधवारी (दि.११) येथे झालेल्या कार्यशाळेतून केली. खुल्या बाजारपेठेतून १ मेगावॅट वीज खरेदी केल्यास वर्षभरात किमान १ कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा दावा या कार्यशाळेत करण्यात आला.
चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए) आणि इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेड (आयईएक्स) यांच्यातर्फे ही कार्यशाळा घेण्यात आली. ‘आयईएक्स’चे उपाध्यक्ष रोहित बजाज, ‘एनर्जी आॅडिटर’ टी. एन. अग्रवाल यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे, सचिव प्रसाद कोकीळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
महावितरण उद्योगांना ७.२१ रुपये प्रतियुनिट या दराने विजेचा पुरवठा करीत असते. हीच वीज खुल्या बाजारपेठेतून खरेदी केल्यास ५.२१ रुपये प्रतियुनिट या दराने मिळू शकते. प्रतियुनिटमागे दोन रुपये बचत होऊ शकते. वर्षभरात १ मेगा वॅटपेक्षा जास्त विजेचा वापर करणाऱ्या उद्योगांची १ कोटी रुपयांची बचत होऊ शकते.

Web Title: MSEDCL's electricity costlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.