शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा ग्राहकांना शॉक; मराठवाड्यात १३ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:59 IST

थकीत वीज बिलाचा भरणा न केल्यास कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई

ठळक मुद्दे थकबाकी न भरताच वीज घेतली का शोधा -महावितरणग्राहकांकडे १ हजार १२१ कोटी रुपयांची थकबाकी

औरंगाबाद : महावितरणने मराठवाड्यात तब्बल १३ लाख ९२ हजार ३१३ ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केला आहे. या ग्राहकांकडे १ हजार १२१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांना थकबाकीचा भरणा न करताच नवीन वीज पुरवठा दिलेला आहे का, आता याची पाहणी करण्याचे निर्देश महावितरणने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

वीज बिलाची थकबाकी न भरता त्याच अथवा इतर नावाने, नवीन वीजजोडणी दिल्याचे आढळून आल्यास आणि संबंधित ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांनी दिले आहेत. वीज ग्राहकांना वारंवार सूचना, विनंत्या करूनही थकीत वीज बिल न भरल्यास तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते. त्यानंतरही वीज ग्राहकाने थकीत वीज बिलाचा भरणा न केल्यास कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते.

...अन्यथा कडक कारवाईथकबाकीसाठी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ठिकाणी वीज ग्राहकांनी थकबाकीच्या संपूर्ण रकमेचा भरणा करूनच नियमानुसार नवीन वीजजोडणी घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश डॉ. नरेश गीते यांनी दिले आहेत.

अशी आहे थकबाकीपरिमंडळ ग्राहक थकबाकी (कोटींमध्ये)            औरंगाबाद- ४,१८,९२७ ३९२. ८८लातूर- ५,४५,१२२ ३६९. ९२नांदेड- ४,२८,२६४ ३५८. ७६एकूण- १३,९२,३१३ १,१२१. ५६

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादbillबिलMarathwadaमराठवाडा