महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाच घेताना अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:04 IST2021-05-13T04:04:46+5:302021-05-13T04:04:46+5:30
बाळनाथ निवृत्ती जोरे असे लाचखोर तंत्रज्ञाचे नाव आहे. लाचलुचपत विभागाकडून प्राप्त माहितीनुसार तक्रारदार तरुणाचे वैजापुर तालुक्यातील सटाणा शिवारात ...

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाच घेताना अटकेत
बाळनाथ निवृत्ती जोरे असे लाचखोर तंत्रज्ञाचे नाव आहे. लाचलुचपत विभागाकडून प्राप्त माहितीनुसार तक्रारदार तरुणाचे वैजापुर तालुक्यातील सटाणा शिवारात शेती आहे. त्यांच्या विहिरीवर त्यांना साडेसात एच.पी. च्या मोटारपंपासाठी वीज जोडणी हवी होती. याकरिता त्यांनी जोरेची भेट घेतली असता वीज जोडणी शुल्क ७ हजार रुपये आणि लाच साडेतीन हजार रुपये असे एकूण १० हजार ५०० हजार रुपये खर्च सांगितला. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता जोरेने लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार यांना बुधवारी दुपारी वैजापूर येथील मुरारीपार्क मधील शर्मा मंडप डेकोरेटर्स यांचे दुकानासमोर बोलावले. यानंतर आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी जोरेने तक्रारदाराकडून साडेतीन हजार रुपये लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी जोरेला लाचेच्या रकमेसह पकडले. ही कारवाई उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर, कर्मचारी भीमराज जिवडे, रविंद्र काळे, भूषण देसाई, चालक देवसिंग ठाकूर यांनी केली.