महावितरणला लावले शेतकऱ्यांनी टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 00:56 IST2016-11-19T00:56:55+5:302016-11-19T00:56:11+5:30
आंबा : परतूर तालुक्यातील आंबा सर्कलमधील कावजवळा येथे वारंवार होणाऱ्या फिडर बिघाडाला कंटाळून त्रस्त परतूर येथील महावितरणच्या कार्यालयाला शुक्रवारी टाळे लावून निषेध व्यक्त केला.

महावितरणला लावले शेतकऱ्यांनी टाळे
आंबा : परतूर तालुक्यातील आंबा सर्कलमधील कावजवळा येथे वारंवार होणाऱ्या फिडर बिघाडाला कंटाळून त्रस्त परतूर येथील महावितरणच्या कार्यालयाला शुक्रवारी टाळे लावून निषेध व्यक्त केला.
कावजवळा व डोल्हारा आंबा परिसरातील डीपीवरील वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे रबीच्या हंगामात पीकाला पाणी देता येत नसल्याने शेतकरी त्रस्त होते. याबाबत वारंवार मागणी करूनही महावितरणचे अभियंता याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयालाच टाळे लावण्याचा निर्णय
घेतला.
कार्यालयाला टाळे ठोकताच रामटेके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती. संबंधित अधिकाऱ्यांनी लहाने यांना परतूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
दरम्यान, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सदरील अधिकाऱ्याला दूरध्वनीवरुन मध्यस्थी करुन वाद मिटवित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वातावरण निवळले. महावितरण अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांतून मात्र रोष व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)