शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे अधिकारी निलंबित

By admin | Updated: July 7, 2015 00:56 IST

औरंगाबाद : परिमंडळातील वैजापूर उपविभागात वीज बिल वसुलीचे काम दिलेल्या धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ग्राहकांकडून वसूल केलेले पूर्ण वीज

औरंगाबाद : परिमंडळातील वैजापूर उपविभागात वीज बिल वसुलीचे काम दिलेल्या धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ग्राहकांकडून वसूल केलेले पूर्ण वीज बिल जुलै २०१४ पासून महावितरणकडे भरले नसल्याचे तपासात समोर आले आहे. या घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी दिली आहे. वैजापूर उपविभाग क्रमांक-१ आणि २ मधील वीज बिल वसुलीचे काम धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेला दिले होते. संस्थेने जुलै-२०१४ पासून जून-२०१५ पर्यंत ग्राहकांकडून वसूल केलेले पूर्ण वीज बिल महावितरणकडे भरले नव्हते. हे तपासणीत समोर आले होते. वैजापूरमध्ये वीज बिल घोटाळा झाल्याचे वृत्त लोकमतने ५ जुलै रोजी ‘महावितरणमध्ये वीज बिल घोटाळा’ या मथळ्याखाली प्रकाशित केले होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कन्नड विभागांतर्गत येणाऱ्या वैजापूर उपविभागातील उपव्यवस्थापक (विवेल) विजय दत्तात्रय कुलकर्णी आणि निम्न स्तर लिपिक सुनील अंभोरे यांना निलंबित करण्याचे आदेश औरंगाबाद ग्रामीणचे अधीक्षक अशोक फुलकर यांनी ६ जुलै दिले आहेत. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे, असे महावितरणचे मुख्य अभियंता चव्हाण यांनी सांगितले. ग्राहकांकडून वसूल केलेले बिल २४ तासांत महावितरणकडे भरणे बंधनकारक आहे. संस्थेने या नियमाचे उल्लंघन केले असून नियमानुसार संस्थाचालकांकडून वसुली १८ टक्के व्याज लावून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.अधिकारी काय करीत होते?महावितरणचे कर्मचारी प्रत्येक महिन्याला संस्थेत येऊन हिशोब तपासणी करून खात्री करीत होते, परंतु एप्रिल-२०१४ पासून एकही अधिकारी संस्थेकडे आला नाही. एप्रिलपासून अधिकारी का आले नाहीत, असा प्रश्न संस्थेने उपस्थित केला आहे.गेल्या सात वर्षापसून संस्था नियमित बिल कंपनीकडे भरीत होती. पण कंपनीने मार्च २०१४ पासून संस्थेचे कमिशन दिले नाही. तुमचा हिशोब बाकी आहे म्हणून कमिशन देण्यासाठी टाळाटाळ केली. महावितरणने २ जुलै रोजी ४३ लाख रुपये भरण्यासाठी नोटीस दिल्यानंतर ते भरले आहेत. त्यानंतरही ३२ लाख रुपये भरण्यासाठी सांगितले, असे संस्थेकडून कळविण्यात आले आहे. धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ग्राहकांकडून वसूल केलेले ६६ लाख रुपये महावितरणकडे भरले आहेत. त्यामध्ये वैजापूर विभाग १ चे ४३ लाख रुपये, तर विभाग -२ च्या २४ लाख रुपयांचा समावेश आहे. उर्वरित रक्कमही संस्था भरण्यास तयार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.आता संस्थांचे आॅडिट होणार४औरंगाबाद शहरात ३१ तर ग्रामीणमध्ये १८ सहकारी संस्थांना वीज बिल भरणा केंद्रे देण्यात आलेली आहेत. या सर्व संस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या संस्थेकडे थकबाकी आडळून येईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.