स्वप्नील चव्हाणच्या अष्टपैलू कामगिरीने एमएसईडीसीएल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:09 AM2017-12-11T01:09:44+5:302017-12-11T01:10:13+5:30

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राम कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत स्वप्नील चव्हाण याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर एमएसईडीसीएल संघाने रविवारी एमआर इलेव्हन संघावर ४ गडी राखून मात केली.

MSDDCL won the all-round performance of Swapnil Chavan | स्वप्नील चव्हाणच्या अष्टपैलू कामगिरीने एमएसईडीसीएल विजयी

स्वप्नील चव्हाणच्या अष्टपैलू कामगिरीने एमएसईडीसीएल विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राम कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत स्वप्नील चव्हाण याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर एमएसईडीसीएल संघाने रविवारी एमआर इलेव्हन संघावर ४ गडी राखून मात केली. एमआर इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत ७ बाद १०९ धावा केल्या. त्यांच्याकडून अब्दुल गफूरने ३ चौकार, एका षटकारासह ४१ व फैजल पटेलने २२ धावा केल्या. एमएसईडीसीएलकडून इनायत अलीने ७ व स्वप्नील चव्हाणने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमएसईडीसीएलने विजयी लक्ष्य १९.२ षटकांत ६ गडी गमावून पूर्ण केले. त्यांच्याकडून स्वप्नील चव्हाणने ५५ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४९ धावा केल्या. पी. सूर्यवंशी व इनायत अली यांनी प्रत्येकी १३ धावा केल्या. एमआर इलेव्हनकडून सईद जलीस व एस. नायर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

Web Title: MSDDCL won the all-round performance of Swapnil Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.