मृणाल, द्रोण यांनी जिंकली १0 वर्षांखालील राज्य टेनिस स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:12 IST2019-03-19T00:12:32+5:302019-03-19T00:12:48+5:30

विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या १0 वर्षांखालील राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत मुंबईच्या द्रोण सुरेश आणि पुणे येथील मृणाल शेळके यांनी अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. द्रोण सुरेश याने अंतिम सामन्यात नाशिकच्या दिविज पवार याच्यावर ४-२, 0-४, ४-0 अशी मात करीत विजेतेपद पटकावले.

Mrinal, Drona won the Under-10 State Tennis Tournament | मृणाल, द्रोण यांनी जिंकली १0 वर्षांखालील राज्य टेनिस स्पर्धा

मृणाल, द्रोण यांनी जिंकली १0 वर्षांखालील राज्य टेनिस स्पर्धा

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या १0 वर्षांखालील राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत मुंबईच्या द्रोण सुरेश आणि पुणे येथील मृणाल शेळके यांनी अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.
द्रोण सुरेश याने अंतिम सामन्यात नाशिकच्या दिविज पवार याच्यावर ४-२, 0-४, ४-0 अशी मात करीत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात आधी द्रोण सुरेश याने मुंबईच्या वीर महाजन याचा ६-२, तर दिविज पवार याने मुंबईच्या आयुष पुजारे याचा ६-0, असा पराभव केला होता.
मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात पुणे येथील मृणाल शेळके हिने आपल्याच शहराच्या मेहक कपूर हिचा ४-१, ५-३ असा पराभव करीत अजिंक्यपदाला गवसणी घातली. अंतिम फेरीआधी मृणाल शेळके हिने उपांत्य फेरीत औरंगाबादच्या वृंदिका राजपूत हिचा ६-२ आणि मेहक कपूर हिने औरंगाबादच्या वसुंधरा भोसले हिचा ६-१ असा पराभव केला होता. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना सुबोध मयेकर, आशुतोष मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Mrinal, Drona won the Under-10 State Tennis Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.