घाटीत ७०० रुपयांत होणार ‘एमआरआय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:08 IST2017-08-24T01:08:14+5:302017-08-24T01:08:14+5:30
घाटी रुग्णालयास जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ‘एमआरआय’च्या तपासणीसाठी २० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

घाटीत ७०० रुपयांत होणार ‘एमआरआय’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयास जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ‘एमआरआय’च्या तपासणीसाठी २० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना १८०० रुपयांऐवजी ७०० रुपयांमध्ये ‘एमआरआय’ची सुविधा देण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली.
दोन वर्षांपूर्वी दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना १८०० रुपयांऐवजी ७०० रुपयांमध्ये ‘एमआरआय’ची सुविधा मिळावी म्हणून पालकमंत्र्यांनी घाटीला ५० लाखांचा निधी दिला; परंतु या निर्णयाची अंमलबजावणी उशिराने झाली. त्यामुळे घाटी रुग्णालयाला मिळालेल्या ५० लाख रुपयांच्या निधीपैकी ४९ लाख ६ हजार ५०० रुपयांचा निधी परत गेला. बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांना ७०० रुपयांत एमआरआय मिळाला होता. यंदा २० लाखांचा निधी प्राप्त झाला असून दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना ७०० रुपयांत एमआरआय देण्यात येत आहे. बाह्यरुग्ण विभागात ७०० रुपयांची पावती घेतल्यानंतर क्ष-किरण विभागात जाऊन आवश्यक ती प्रक्रिया करून एमआरआय काढला जातो, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.