श्री मडिवाळ शिवाचार्य महाराज मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात
By Admin | Updated: March 1, 2017 01:13 IST2017-03-01T01:11:45+5:302017-03-01T01:13:07+5:30
अहमदपूर : संतश्रेष्ठ सद्गुरु श्री मडिवाळ शिवाचार्य महाराज मंदिराचा कलशारोहण सोहळा अहमदपूर येथील भक्तीस्थळ येथे मंगळवारी दुपारी उत्साहात झाला

श्री मडिवाळ शिवाचार्य महाराज मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात
अहमदपूर : संतश्रेष्ठ सद्गुरु श्री मडिवाळ शिवाचार्य महाराज मंदिराचा कलशारोहण सोहळा अहमदपूर येथील भक्तीस्थळ येथे मंगळवारी दुपारी उत्साहात झाला. या सोहळ्यानिमित्त शोभायात्राही काढण्यात आली.
यावेळी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज, शंभुलिंग शिवाचार्य महाराज, निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज, करबसव शिवाचार्य महाराज, दिगंबर शिवाचार्य महाराज, बसवलिंग पट्टदेवरू महाराज, सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, शंभुलिंग शिवाचार्य महाराज, महादेव शिवाचार्य महाराज, कोरणेश्वर स्वामीजी, डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, सोमलिंग शिवाचार्य महाराज, नीळकंठ शिवाचार्य महाराज, शंकरलिंग शिवाचार्य महाराज, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानुर, शंकर शिवाचार्य महाराज, चन्नबसवानंद महास्वामीजी, सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज, गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज आदींची उपस्थिती होती. दुपारी २ वाजता कलशारोहण सोहळा झाला. त्यानंतर शिवकीर्तन, शिवजागर आदी भरगच्च कार्यक्रम झाले असून, १ मार्च रोजी भक्तीस्थळ येथे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्मशताब्दी सोहळा होणार आहे. (प्रतिनिधी)