मिस्टर कव्हेकरांच्या सूचना !
By Admin | Updated: December 22, 2014 01:01 IST2014-12-22T00:53:37+5:302014-12-22T01:01:50+5:30
लातूर : जिल्हापरिषद सदस्यांसह कर्मचाऱ्यांना माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी स्वच्छता मोहिम तसेच शिक्षण विभागातील गोंधळाबाबत मार्गदर्शन केले़

मिस्टर कव्हेकरांच्या सूचना !
लातूर : जिल्हापरिषद सदस्यांसह कर्मचाऱ्यांना माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी स्वच्छता मोहिम तसेच शिक्षण विभागातील गोंधळाबाबत मार्गदर्शन केले़ जि़प. अध्यक्षांच्या दालनात ही मार्गदर्शन बैठक गुरुवारी झाली़ अध्यक्षांनी मात्र ही बैठक नव्हती, पुतळ्याच्या कामासंदर्भात त्यांनी जि़प़ला भेट दिली असल्याचे सांगितले़
जि़प़ अध्यक्षपदी प्रतिभा पाटील यांची निवड झाल्यापासून माजी आ़ शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे जि़प़ला वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे़ सर्वसाधारण सभेपूर्वी कव्हेकरांनी शिक्षण विभागाची बैठक घेतल्याने सर्वसाधारण सभेत विरोधकांनी गोंधळ केला होता़ रामचंद्र तिरुके यांनी माजी आमदारांना बैठक घेता येते का ? असा प्रश्न उपस्थित केला होता़ त्यावेळी जि़प़अध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी कव्हेकरांनी बैठक घेतली नाही़ तर त्यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रीत केल्याचे स्पष्टीकरण दिले होते़ त्यानंतर माजी आक़व्हेकर जि़प़त आले नाहीत़ दोन महिन्यानंतर गुरुवारी ते आले. यावेळी शिक्षण विभागाची बैठक होणार होती़ ती बैठक अचानक रद्द झाली़ हा केवळ योगा योगा की कव्हेकर आल्याने ही बैठक रद्द झाली का ? या विषयावर कोणी बोलत नसले तरी, दबक्या अवाजात त्यांच्या येण्यामुळेच बैठक रद्द झाल्याची चर्चा आहे़ बैठक रद्द झाली असली तरी जि़प.अध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या कक्षात उपस्थित सभापती, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. खुद जि़प़ अध्यक्षांनी मार्गदर्शन केल्याचा दुजोरा दिला़ (प्रतिनिधी)