शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam :‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष; महात्मा फुले चौकात हजारो विद्यार्थी जमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 18:02 IST

MPSC exams postponed राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी ‘एमपीएससींची राज्यसेवा पूर्वपरीक्षा ऐनवेळी रद्द करुन ती पुढे ढकलण्यात आली आहे.

औरंगाबाद : राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार लोकसेवा आयोगाने १४ मार्चरोजी होऊ घातलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा- २०२० ही पुढे ढकलण्याचा निर्यण घेतला आहे. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून सलग तीनवेळा ही परीक्षा पुढे ढकल्यात आल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शहरातील औरंगपुरा येथे महात्मा फुले चौकात हजारो विद्यार्थ्यांनी जमून शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला.

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी ‘एमपीएससींची राज्यसेवा पूर्वपरीक्षा ऐनवेळी रद्द करुन ती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाने  राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द केल्याचे समजताच विद्यार्थ्यांनी तीव्र नापसंती दर्शवली. हजारो विद्यार्थी महात्मा फुले चौकात जमा झाले. आक्रमक विद्यार्थ्यांनी शासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परीक्षा घेण्याची मागणी केली. वर्षभरात सलग तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. भविष्य अंधकारमय झाले आहे, उमेदीची वर्ष वाया जात असून परीक्षा होत नसल्याने हाती काहीच लागत नसल्याचा संताप आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद शहरातील ५९ केंद्रावर १९ हजार ६५६ विद्यार्थी परीक्षा देणार होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची पूर्वतयारी करण्यात आली होती. या परीक्षेच्या कामासाठी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई अशा जवळपास ६०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. या कर्मचाऱ्यांचे उद्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रशिक्षण देखिल घेण्यात येणार होते; परंतु, राज्यात वाढत चालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही परीक्षा घेण्यास हरकत घेतली. त्यानुसार राज्य लोकसेवा आयोगाने तातडिने ही नियोजित परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे एका अध्यादेशाद्वारे गुरुवारी जाहीर केले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद