एमपीएस, स्वामी विवेकानंद अकॅडमी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:59 IST2018-01-11T00:59:09+5:302018-01-11T00:59:28+5:30
जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पब्लिक स्कूलने (एमपीएस) मॉरल किड्स प्रशालेचा आणि स्वामी विवेकानंद अकॅडमीने सेंट जोन्स संघाचा पराभव केला.

एमपीएस, स्वामी विवेकानंद अकॅडमी विजयी
औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पब्लिक स्कूलने (एमपीएस) मॉरल किड्स प्रशालेचा आणि स्वामी विवेकानंद अकॅडमीने सेंट जोन्स संघाचा पराभव केला.
सकाळच्या सत्रात एमपीएसने १५ षटकांत ५ बाद ११४ धावा केल्या. त्यांच्याकडून कुशल कांबळेने २ चौकार व एका षटकारासह ३०, तर अक्षय मेहेत्रे व धीरज कोपनर यांनी प्रत्येकी २० धावा केल्या. मॉरल किडस प्रशालेकडून मिथिलेष चौसाळकरने २ गडी बाद केले. आशिष पवार व स्वप्नील राठोड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात मॉरल किड्स संघ ५८ धावाच करू शकले. एमपीएसकडून कुशल कांबळेने ६ धावांत ३ गडी बाद केले. कुणाल शिंदे व कुणाल पोपळघट यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
दुसºया सामन्यात सेंट जोन्सचा संघ १० षटकांत ४१ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून अभिषेक कांबळे याने सर्वाधिक १८ धावा केल्या. स्वामी विवेकानंद अकॅडमीकडून त्यांच्याकडून देवश्री भावसार याने ११ धावांत ४ गडी बाद केले. यश गत्रे, घनश्याम सोनवणे, रोहित बनसोडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात स्वामी विवेकानंद अकॅडमीने विजयी लक्ष्य ३.४ षटकांत एकही गडी न गमावता गाठले. त्यांच्याकडून आनंद साळवेने १५ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद २३ व ओंकार शिंदेने नाबाद ९ धावा केल्या.