शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील सिनेमे आता मराठवाड्यात! ११ व्या अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 17:37 IST

मराठवाड्याच्या 'सिनेमा' प्रेमाला जागतिक व्यासपीठ! ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६; प्रेक्षकांना ५ दिवसांची मेजवानी.

छत्रपती संभाजीनगर: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणारा बहुप्रतिक्षित अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (AIFF) च्या तारखांची आयोजकांनी आज (शुक्रवार) घोषणा केली आहे. बुधवार, २८ जानेवारी ते रविवार, ०१ फेब्रुवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांच्या मांदियाळीत हा महोत्सव साजरा होणार आहे. हा भव्य महोत्सव रुक्मिणी सभागृह (एमजीएम परिसर) आणि आयनॉक्स थिएटर (प्रोझोन मॉल) येथे आयोजित करण्यात आला आहे.

केवळ महोत्सव नाही, मराठवाड्याचा 'सांस्कृतिक हब'नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पार पडणार आहे. या आयोजनामागे केवळ चित्रपट दाखवणे हा हेतू नाही, तर छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने 'सांस्कृतिक केंद्र' व 'प्रोडक्शन हब' म्हणून जागतिक पातळीवर पोहोचवणे, हा प्रमुख उद्देश आहे. चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत आणि युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, जेणेकरून त्यांची कला व तांत्रिक जाणीव अधिक सशक्त आणि समृद्ध होईल. तसेच, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण ध्येयही या महोत्सवामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

पद्मपाणी पुरस्कारासह कार्यक्रमांची रेलचेलयावर्षीच्या महोत्सवात सिनेरसिकांसाठी अनेक खास आकर्षणे असणार आहेत:

पुरस्कार: प्रतिष्ठेचा 'पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार' आणि 'सुवर्ण कैलास सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार'.

विशेष आयोजन: भारतीय सिनेमा स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, जागतिक सिनेमा विभाग, रेट्रोस्पेक्टीव्ह आणि ट्रिब्युट.

संवाद: मास्टर क्लास, विशेष व्याख्यान, स्पेशल स्क्रिनिंग आणि परिसंवाद.

या महोत्सवात महाराष्ट्रातील सिनेरसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, फेस्टिवल डायरेक्टर सुनील सुकथनकर, चंद्रकांत कुलकर्णी, निमंत्रक नीलेश राऊत आदींनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajanta-Ellora Film Fest: Global Cinema Comes to Marathwada in 2026!

Web Summary : The 11th Ajanta-Ellora International Film Festival (AIFF) will be held from January 28th to February 1st, 2026, in Chhatrapati Sambhajinagar. Aiming to make the region a cultural hub, the festival features film screenings, awards, master classes, and aims to boost tourism.
टॅग्स :cinemaसिनेमाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmgm campusएमजीएम परिसरAshutosh Gowarikarआशुतोष गोवारिकर