माझी ई शाळा सुरु करण्यासाठी हालचाली
By Admin | Updated: June 22, 2014 00:41 IST2014-06-22T00:36:48+5:302014-06-22T00:41:52+5:30
विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २३ शाळेत संगणक कक्ष असले तरी हे कक्ष मात्र कुलूपबंद आहेत. पण आता या संगणक कक्षाची धुळ झटकण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

माझी ई शाळा सुरु करण्यासाठी हालचाली
विठ्ठल फुलारी, भोकर
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २३ शाळेत संगणक कक्ष असले तरी हे कक्ष मात्र कुलूपबंद आहेत. पण आता या संगणक कक्षाची धुळ झटकण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. या सोबत जिल्हा परिषदेच्या शळेत ‘माझी ई शाळा’ सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
भोकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २३ शाळेत संगणक कक्ष उभारण्यात आले आहेत. पण या संगणक कक्षाकडे चक्क दुर्लक्ष झाल्याने याचा उपयोग विद्यार्थ्यांना होत नाही. भोकर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर.एन. मुधोळकर यांनी या बाबत पुढाकार घेतल्याने आता हे संगणक कक्ष पुन्हा सुरू होत आहेत. या २३ शाळेतील १३१ संगणक आता विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणार आहेत. संगणक कक्ष सुरू करण्या सोबतच ही तालुक्यातील केंद्रावर ‘माझी ई शाळा’ सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भोकर येथील जिल्हा परिषद हायस्कूल पासून सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने रंगरंगोटी, आसनव्यवस्था या कामाला सुरुवात झाली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करु जिवंत चित्राद्वारे प्रचार केलेला अभ्यासक्रम प्रोजेक्टरद्वारे दाखवत माझी ई शाळामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, भूगोल, गणित, ईतिहास या विषयातील बारकावे कळणार आहेत. यामुळे कमी वेळात या विषयाचे जास्त आकलन होणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
‘माझी ई शाळा’ तालुक्यात राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रथम भोकर येथील हायस्कूलमध्ये ही शाळा सुरू होणार आहे. या नंतर हळूहळू ग्रामीण भागातील शाळेतही माझी ई शाळा सुरू करण्यात येणार आहे’
आर.एन. मुधोळकर (गटशिक्षणाधिकारी)
विकास कामासाठी लोकमतने पुढाकार घेतलेल्या शिवनगर येथे मागील वर्षी माझी ई शाळा सुरू करण्यात आली. या जिल्हा परिषदच्या शाळेने घेतलेला हा माझी ई शाळेचा वसा आता तालुक्यातील शाळेत पोंहचणार आहे. शिवनगर येथील मुख्याध्यापक व्ही.एस. चौव्हाण (ठाकूर) हे माझी ई शाळा सुरू करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.