विजयादशमीनिमित्त संघाचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:46 IST2017-09-29T00:46:11+5:302017-09-29T00:46:11+5:30
विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने परभणी शहरातून संचलन केले जाणार आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.

विजयादशमीनिमित्त संघाचे संचलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने परभणी शहरातून संचलन केले जाणार आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
३० सप्टेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता खंडोबा बाजार येथील मराठवाडा शाळेतून संचलनाला प्रारंभ होईल. संचलनासाठी संघाचा संपूर्ण गणवेश आणि दंडासह सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिंतूररोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर विजयादशमी उत्सव व शस्त्र पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास श्रीश्रीश्री १०८ ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच देवगिरी प्रांताचे सहप्रचारक पराग भालचंद्र कंगले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.