एसटी कामगारांचे आंदोलन

By Admin | Updated: December 19, 2014 00:56 IST2014-12-19T00:46:13+5:302014-12-19T00:56:18+5:30

उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या रोड ट्रान्सपोर्ट आणि सेफ्टी बिल २०१४ नवीन कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे एसटी महामंडळावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे

Movement of ST workers | एसटी कामगारांचे आंदोलन

एसटी कामगारांचे आंदोलन


उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या रोड ट्रान्सपोर्ट आणि सेफ्टी बिल २०१४ नवीन कायद्यातील प्रस्तावित बदलामुळे एसटी महामंडळावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे दिल्ली येथे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठींबा म्हणून उस्मानाबाद, कळंब येथेही आंदोलन करण्यात आले.
उस्मानाबाद विभागाअंतर्गत गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक २०१४ मधील एसटीला मारक असलेली कलमे रद्द करावीत, खाजगी वाहतुकीला टप्पे वाहतुकीचे परवाने देऊ नयेत, खाजगी वाहनांना बसस्थानकांचा वापर करण्यास परवानगी देऊ नये, निविदा पध्दतीने प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी देऊ नये, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात विभागीय अध्यक्ष अग्निवेश शिंदे, सचिव शरद राऊत, कार्याध्यक्ष राजाभाऊ कुंभार, सहसचिव मधुकर अनभुले, विभागीय कार्यालय अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, सचिव अनिल जमाले, जयकुमार गायकवाड, सुरेश यादव, दादा घोडके, सुरेश देशमुख, किशोर मुंडे, संजय टेकाडे, वसंत टेकाळे, अनंत गायकवाड, सचिन गायकवाड, अमर जाधव, अर्जुन साळुंके, किशोर शिंदे, सुधीर बामणकर, महिला प्रतिनिधी नम्रता भांबुरे, सुनंदा धर्माधिकारी, तारामती म्हेत्रे, वंदना इनामदार आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Movement of ST workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.