महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 10, 2014 00:47 IST2014-07-09T23:57:18+5:302014-07-10T00:47:56+5:30
हिंगोली : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
हिंगोली : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
नायब तहसीलदारांना राजपत्रीत अधिकाऱ्यांचा दर्जा देवूनही त्यांना वर्ग ३ चा ग्रेड देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा ग्रेड वाढवावा, महसूल विभागातील लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करावे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास शासकीय नोकरीत घ्यावे, महसूल विभागातील नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीतून भरावीत, सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लिपीक संवर्गात पदोन्नतीसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवाव्यात आदी मागण्यांसाठी बुधवारी दुपारी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण फुलारी यांना देण्यात आले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ए. पी. भोजणे, सचिव पी. एन. ऋषी, उपाध्यक्ष एल. एच. गरुड आदींची नावे आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)