पोलीस बॉईज असोसिएशनचे आंदोलन
By Admin | Updated: December 22, 2014 23:57 IST2014-12-22T23:57:39+5:302014-12-22T23:57:39+5:30
उस्मानाबाद : नागपूर येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने सोमवारी

पोलीस बॉईज असोसिएशनचे आंदोलन
उस्मानाबाद : नागपूर येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नागपूर येथे पोलीस निरीक्षक पराग जाधव हे कर्तव्यावर होते़ त्यावेळी त्यांना शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मारहाण केली़ या मारहाणीचा निषेध करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, कठोर कारवाई करावी, अशा घटना यापुढे होवू नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदारांचे निलंबन करावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे़ या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे, मराठवाडा अध्यक्ष प्रा़ अविनाश अवताडे, विधी विभाग जिल्हाध्यक्ष अॅड़ सुधीर धुमाळे, अॅड़ अमर चव्हाण, विशाल शिंदे, शक्ती पांडागळे, राहूल गोरे, महेश मगर, प्रविण वाघमारे, अक्षय वाघचौरे, प्रविण घुले, किरण आल्टे, विजय कांबळे, आनंद झिंगाडे, आकाश बनसोडे, स्वप्नील माने, अजय फडतारे, कुणाल वाघमारे, मनोज सोनवणे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)