बजाजनगरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:02 IST2021-08-22T04:02:12+5:302021-08-22T04:02:12+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरात गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.२१) रस्त्यावर चुली पेटवून भाववाढीचा निषेध ...

बजाजनगरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आंदोलन
वाळूज महानगर : बजाजनगरात गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.२१) रस्त्यावर चुली पेटवून भाववाढीचा निषेध करण्यात आला.
केंद्र शासनाच्या वतीने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत भरमसाट वाढ केली जात असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद ग्रामीण महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले. महिला पदाधिकाऱ्यांनी चुलीवर स्वयंपाक करीत केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्षा छाया जंगले, जिल्हा उपाध्यक्षा धनश्री कांबळे, राष्ट्रीय सचिव सोनाली देशमुख, राष्ट्रवादी युवतीच्या शहराध्यक्षा अंकिता विधाते, बीड जिल्हा निरीक्षक वैशाली पाटील, माजी जिल्हाध्यक्षा तेजस्विता पंडित, जिल्हा उपाध्यक्षा विद्या मोरे, पुष्पा गायकवाड, उमा नेव्हाळ, जिल्हा सहसचिव स्मिता तुपे आदींची उपस्थिती होती. या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून वाळूज अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या.
फोटो ओळ- बजाजनगरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात चुलीवर स्वयंपाक करून केंद्र शासनाचा निषेध करताना पदाधिकारी.
---------------------------