पालिका कर्मचाºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:55 IST2017-08-09T23:55:35+5:302017-08-09T23:55:35+5:30

नगरपालिकेच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी पालिकेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

 Movement of municipal employees | पालिका कर्मचाºयांचे आंदोलन

पालिका कर्मचाºयांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नगरपालिकेच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी पालिकेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
नगरपालिकेच्या कर्मचाºयांना सातवा आयोग लागू करावा, ज्या नगरपलिकेची १०० टक्के कर वसूली असेल त्याच पालिकेला शासन अनुदान देईल, अशी अट शासनाने रद्द करावी आदी मागण्यांसाठी नगरपालिकेचे मुख्याधिकाºयांसह कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन केले. नगरपालिका कर्मचाºयांसाठी शासन विविध जाचक अटी लादून कर्मचाºयांची कोंडी करीत आहे. राज्यातील महापालिकांची करवसूली १०० टक्के होत नसताना शासनाकडून नगरपालिकेला संपूर्ण कर वसुलीची टाकलेली अट अन्यायकारक आहे. यामुळे शहराच्या विकासावर याचा गंभीर परिणाम होणार आहे. शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यातील नगरपालिका, कर्मचाºयांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन करून निषेध केला. शासनाने यावर गांभीर्याने विचार करून कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा आणि शंभर टक्के कर वसुलीचा निर्णय मागे घेण्याची एकमुखी मागणी केली.
यावेळी राजाराम गायकवाड, सुरेंद्र ठाकूर, अब्दुल कादर अब्दुल रहिम,देविदास भागूजी सुतार, बाबुराव गवळे, सलीम बेग मन्ना बेग, अशोक वाघमारे, विजय फुलब्रीकर, अर्जुन राठोड, चंद्रकांत रगडे, काका राजगिरे, संजय हिरे, चंद्रकांत खनपटे, साहेबराव सकट आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Movement of municipal employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.