प्रवेश शुल्क निविदेसाठी महापालिकेत हालचाली
By Admin | Updated: July 17, 2014 01:36 IST2014-07-17T01:29:26+5:302014-07-17T01:36:26+5:30
औरंगाबाद : मनपाने पथकर (प्रवेश शुल्क) नाक्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रियेच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

प्रवेश शुल्क निविदेसाठी महापालिकेत हालचाली
औरंगाबाद : मनपाने पथकर (प्रवेश शुल्क) नाक्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रियेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सहकार एजन्सी प्रा. लि. या संस्थेकडे सध्या कंत्राट आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी निविदा प्रक्रिया करून ठेवल्यास पालिकेला अडचण येणार नाही. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. कंत्राटदार याच महिन्यात निश्चित होण्याची शक्यता आहे.
यावर्षी पालिकेला २२ कोटी रुपयांमध्ये ठेका द्यायचा आहे. ३ कोटी रुपये पालिकेला नैसर्गिक वाढीनुसार हवे आहेत. २००६ पासून ३० जून २०११ पर्यंत सहकार एजन्सीकडे जकात वसुलीचा ठेका देण्यात आला होता. त्याच संस्थेला गेल्यावर्षी पथकर वसुलीचे कंत्राट देण्यात आले होते. १ आॅक्टोबर २०१३ ते ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत १७ कोटी २६ लाख रुपयांचे उत्पन्न मनपाला अपेक्षित होते. १ कोटी ९४ लाख रुपये जास्तीचे देत १९ कोटी २६ लाख रुपयांत सहकारला कंत्राट देण्यात आले. १ आॅक्टोबर २०१४ ते ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत मनपाला २२ कोटी रुपयांचे उत्पन्न पथकर वसुलीतून हवे आहे.
मागच्या वर्षी ३ कोटींचा फटका
२२ कोटी रुपयांचे कंत्राट १९ कोटी २६ लाख रुपयांना देऊन मनपाने स्वत:चे नुकसान करून घेतल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी मागच्या वर्षी केला होता.
अर्थपूर्ण वाटाघाटीनंतर तो विरोध मावळला होता. यावर्षी २५ कोटींमध्ये ठेका दिला जावा, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.