शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव रस्त्याचा कंत्राटदार बदलण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 20:33 IST

कंत्राटदाराला दिलेले ६० कोटी बँकेने घेतले वळती करून

- विकास राऊत 

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणारा औरंगाबाद ते अजिंठा ते जळगाव या रस्त्याच्या कंत्राटदाराला राज्य महामार्ग प्राधिकरणाने दिलेले ६० कोटी रुपये बँकेने वळती करून घेतल्यामुळे कंत्राटदाराला त्या कामासाठी पैसे कुठून उभे करावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर कमी भावाने काम देऊन फसगत झाल्याची भावना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली आहे. १० टक्क्यांपेक्षा कमी भावाने काम करणाऱ्या कंत्राटदाराला काम न देण्याबाबत शासनाने मध्यंतरी एक अध्यादेश काढला होता; परंतु तो अध्यादेश या कामासमोर फिका पडला आहे. परिणामी चिखल, खड्डेमय झालेला तो रस्ता सध्या अपघात मार्ग म्हणून पुढे आला आहे. 

आंध्र प्रदेशातील ऋत्विक एजन्सीला त्या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. १ हजार कोटींच्या आसपास त्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन सव्वा ते दीड वर्षाचा काळ लोटला आहे. यातील ५० टक्के रक्कम कंत्राटदाराला देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी बँक गॅरंटी मिळावी, यासाठी कंत्राटदार प्रयत्न करीत होता. महामार्ग प्राधिकरणानेदेखील ६० कोटी रुपयांचा धनादेश कंत्राटदाराला दिला. कंत्राटदाराने धनादेश बँकेत टाकला आणि बँकेने ती रक्कम इतर देण्यांच्या तडजोडीत वळती करून घेतली.

कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाची यामुळे कोंडी झाली आहे. असे सूत्रांनी सांगितले. आम्ही ६० कोटींचे बिल दिले होते, बँकेत जमा करताच ते बँकेने काढून घेतले. कंत्राटदारावर किती कर्ज आहे हे माहिती नाही. भटनागर म्हणून कंत्राटदाराकडे हे काम देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने काढणे म्हणजे त्या कामाला प्रचंड उशीर लागेल. त्यामुळे थर्ड पार्टीकडून काम करण्याबाबत विचार सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादJalgaonजळगाव