ग्रामसेवकांचे आंदोलन
By Admin | Updated: July 3, 2014 00:15 IST2014-07-03T00:12:45+5:302014-07-03T00:15:39+5:30
पाथरी : ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांची वेतन त्रुटी दूर न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामसेवक शासनाशी लढा देत आहेत़

ग्रामसेवकांचे आंदोलन
पाथरी : ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांची वेतन त्रुटी दूर न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामसेवक शासनाशी लढा देत आहेत़ ग्रामसेवकांच्या त्रुटी दूर करा आणि इतर काही मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी २ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे़
या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीचे शिक्के आणि ग्रामपंचायतीच्या कपाटाच्या चाव्या गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये जमाही केल्या आहेत़ या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचा कारभार खोळंबून पडणार आहे़
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने मागील काही वर्षांपासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे़ महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी ग्रामसेवक संघटनेने व्यवस्थीतरित्या पार पाडली़ परंतु, शासन नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करीत नसल्याने आगामी काळात नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावा, कंत्राटी ग्रामसेवकाचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकांप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून ग्राह्य धरण्यात यावा, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावा, प्रवास भत्ता पगारासोबत ३ हजार रुपये देण्यात यावा, सर्व संवर्गाकरीता बदलीचे धोरण एकच ठेवण्यात यावे या आणि इतर मागण्या या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत़ शासनाने संघटनेच्या मागण्यांकडे आजपर्यंत गांभीर्याने पाहिले नसल्याने ग्रामसेवकांकडून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे़ पाथरी पंचायत समितींतर्गत सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक या आंदोलनामध्ये २ जुलैपासून सहभागी झाले आहेत़ ग्रामपंचायतीच्या कामाकाजाचे शिक्के आणि कार्यालयातील कपाटाच्या चाव्या सामूहिकरित्या ग्रामसेवकांनी पाथरी येथील गटविकास अधिकारी कार्यालयाकडे जमा केल्या आहेत़ या आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष आऱ टी़ राठोड, उपाध्यक्ष बी़ जे, इखे, सचिव एस़ यु़ कच्छवे, एम़ बी़ डुकरे, बी़ एस़ मादनकर, जे़ आऱ भिसे, एम़ आऱ जागापुरे, गोरे, ए़ एस़ धुमाळ आदी सहभागी झाले आहेत़ (वार्ताहर)