आचारसंहिता भंग प्रकरणी बोल्डेंवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली
By Admin | Updated: May 8, 2014 00:07 IST2014-05-08T00:06:56+5:302014-05-08T00:07:08+5:30
बीड : आचारसंहितेत जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी विभागात आरोग्य जनसंपर्क अधिकार्याचे पद शल्यचिकित्सक अशोक बोल्डे यांनी भरले होते.

आचारसंहिता भंग प्रकरणी बोल्डेंवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली
बीड : आचारसंहितेत जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी विभागात आरोग्य जनसंपर्क अधिकार्याचे पद शल्यचिकित्सक अशोक बोल्डे यांनी भरले होते. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आचारसंहिता विभागातील अधिकारी व्ही.बी. निलावाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. लोकसभा निवडणुकी दरम्यान आचारसंहितेच्या काळातच जिल्हा रूग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी पदभरती केली. विशेष म्हणजे बोल्डे यांनी निवडणूक विभागाची कसलीच परवानगी न घेता ही भरती केली असल्याची बाब ‘लोकमत’ने सर्वप्रथम पुढे आणली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी बोल्डेंना खुलासा मागविला होता. यात खुद्द बोल्डेंनी आचारसंहिता भंग झाल्याचे मान्य केले. रात्री ९ पर्यत गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)